Tarun Bharat

पाठदुखी, कंबरदुखीवर रामबाण उपाय : मकरासन, भुजंगासन

प्रतिनिधी /पणजी

‘योग’ आज जीवनाचा अविभाज्य अंग बनला आहे. आपल्याला आज पूर्ण निरोगी व तंदुरुस्ती रहायचे असेल तर योगाला पर्याय नाही. 21 जून या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने आपण दररोज काही योग प्रकारांचा अभ्यास करणार आहोत.

आजच्या धावपळीच्या व दगदगीच्या जीवनशैलीमुळे आपल्याला अनेक आजारांचा सामना करावा लागतो. त्यामध्ये प्रामुख्याने सांधेदुखी, पाठदुखी, मणक्याचे दुखणे, कंबरदुखी इत्यादी हाडांसंबंधित दुखणी तर पाचवीलाच पुजली आहेत. यावर आपण काही मोजकीच 4 ते 5 आसने व 10 ते 15 मिनिटांच्या अभ्यासाने आपण सहजच मात करू शकतो.

चला तर आजपासून आपण यांच्या शास्त्राsक्त अभ्यासाला सुरुवात करुया, खालील दिलेली आसने आपण त्याच क्रमाने व तेवढा वेळ देऊन केली तर आपण सर्व प्रकारच्या निर्देशित दुखण्यातून अगदी काही मोजक्या दिवसांत आराम प्राप्त करू शकतो.

  • 1) मकरासन-2 प्रकार
  • 2) भुजंगासन-3 प्रकार
  • 3) शलभासन-2 प्रकार
  • 4) मर्कटासन-3 प्रकार

मकरासन

लाभ : गृध्रस (sciatica), स्लिप डिस्क, मणक्यांचे दुखणे, सर्वायकल स्पांडिलायटीस (मान अखडणे) इत्यादी मणक्यांच्या व पाठीच्या आजारावर अत्यंत परिणामकारी आसन.

विधी : 1) दोन्ही हात दाढेखाली कोपरावर जमिनीवर ठेवावे व पोटापर्यंतचे शरीर हात व हनुवटीवर तोलून धरावे.

2) श्वास आत घेता घेता एक – एक पाय आळीपाळीने एका पाठोपाठ एक दुमडुन (कुल्याला खोटेचा स्पर्श होईस्तोवर दुमडावे) न थांबता ही क्रिया करावी.

3) दुसऱया प्रकारामध्ये दोन्ही पाय एकाचवेळी दुमडुन श्वास आत घ्यावे व पाय पुन्हा जमिनीवर टेकवताना श्वास सोडावा.

4) वरील दोन्ही पाय दुडण्याची प्रक्रिया सतत न थांबता 10 ते 15 मिनिटे करावी.

सावधानता : गरोदर महिला व पाठ जास्त दुखत असल्यास योगाचार्य अथवा वैद्यांच्या सल्यानुसार करावे.

भुजंगासन

लाभ : लठ्ठपणा, हात व खाद्यांच्या सुदृढतेसाठी तसेच पाठदुखी, कंबरदुखी व मणक्यांच्या आजारावर अचुक उपाय करणारे आसन.

विधी: 1) पोटावर झोपून दोन्ही हात जमिनीवर छातीच्या बाजूला ठेवावे. दोन्ही पाय जमिनीवर एकमेकांना टेकवून तळवे आकाशाच्या दिशेने करावे. श्वास आत घेत, त्यानंतर दोन्ही हातावर जोर देऊन बेंबीपर्यंतचा शरीराचा भाग उचलून संपूर्ण शरीराचा भार दोन्ही हातांवर तोलवा. त्यानंतर मान व डोके जास्तीत जास्त वरच्या दिशेला उचलून धरावे. दोन्ही हातांचे बाहु छातीला टेकवून ठेवावे व जेवढा वेळ श्वास रोखून राहता येईल तेवढा वेळ या अंतिम स्थितीत राहून मग श्वास सोडत पुन्हा प्राथमिक स्थितीत यावे.

2) या आसनाच्या दुसऱया प्रकारात दोन्ही हात आपल्या हनुवंटीखाली (चित्रात दाखवल्याप्रमाणे) एकावर – एक ठेवावे. त्यानंतर सावकाश श्वास घेता – घेता संपूर्ण शरीर कंबरेपर्यंत दोन्ही हातांवर तोलून धरावे. मान व डोके संपूर्ण वरच्या दिशेने करुन या अंतिम स्थितीत श्वास रोखून राहता येईल तेवढे राहावे व मग सावकाश श्वास सोडत पुन्हा पूर्व स्थितीत यावे.

महत्त्वाचे : 1) गरोदर महिला व आत्यंतिक पाठदुखी असणाऱयांनी योगाचार्य व वैद्यांच्या सल्यानुसार करावे.

2) पाठदुखीवर एकावेळी सलग 5 ते 15 वेळा करावे व वजन कमी करण्यासाठी थोडय़ा वेगाने 50 ते 100 वेळा.

Related Stories

प्रवीण आर्लेकर यांना पितृशोक

Amit Kulkarni

रविवारी कोरोनाचे दोन बळी

Omkar B

मडगावच्या ईएसआय हॉस्पिटलमध्ये महिला कर्मचारीचा धिंगाणा

Amit Kulkarni

पर्वरीतील जलशुद्धीकरण प्रकल्पाला पाणीपुरवठा करा

Amit Kulkarni

बोरी प्रतिभा प्रेन्ड्स सर्कलचा 23 रोजी हिरक महोत्सवी समारंभ

Amit Kulkarni

पद्माकर महाराज संप्रदायाचे विश्वस्त गोविंद खंवटे यांचे निधन

Amit Kulkarni