Tarun Bharat

कर्करोगावर सापडले रामबाण औषध

Advertisements

ब्रिटिश वैज्ञानिकांचा दावा ः औषधाचे परीक्षण सुरू

वृत्तसंस्था/ लंडन

कर्करोगाला असाध्य आजार मानले जाते. वैज्ञानिकांनी बहुतांश आजारांवर प्रभावी उपचार शोधून काढले आहेत, परंतु कर्करोग पूर्णपणे नाहिसा करणारा उपचार  अद्याप उपलब्ध झालेला नाही. वैज्ञानिक कर्करोगावरील उपचार शोधण्यासाठी दिवसरात्र संशोधन करत आहेत. याच दिशेने ब्रिटनच्या वैज्ञानिकांना महत्त्वपूर्ण यश हाती लागले आहे.  ब्रिटनच्या वैज्ञानिकांनी एका नव्या प्रकारच्या कॅन्सर थेरपीचा शोध लावला आहे. यात सामान्य विषाणूपासून एकप्रकारचे औषध तयार करत ते प्रभावित ठिकाणी इंजेक्ट करण्यात येते. काही लोकांवर झालेल्या परीक्षणात याचे उत्साहवर्धक निष्कर्ष समोर आले आहेत. या थेरपीमुळे कर्करोगाचा एक रुग्ण पूर्णपणे बरा झाला, तर दुसऱया व्यक्तीचा टय़ूमरही कमी झाला आहे.

वैज्ञानिकांनी कोल्ड सोर व्हायरसचा वापर करत हे औषध तयार केले आहे. हे औषध कोल्ड सोर व्हायरल किंवा हर्प्स सिंपलेक्सचे सौम्य व्हर्जन असून यात टय़ूमर किंवा कॅन्सर सेल नष्ट करण्याच्या दृष्टीने बदल करण्यात आले आहेत. हे इंजेक्शन कॅन्सरच्या ऍडव्हान्स स्टेजयुक्त रुग्णांना नवे जीवन देऊ शकते. परंतु अद्याप याबाबतीत अधिक अध्ययन करण्याची गरज असल्याचे वैज्ञानिकांनी म्हटले आहे.

या औषधाचे इंजेक्शन थेट कॅन्सर सेलवर आक्रमण करण्यासाठी टय़ूमरच्या ठिकाणी दिले जाते. या औषधातील विषाणू कॅन्सर सेल्सवर हल्ला करून त्यांना नष्ट करते आणि इम्युन सिस्टीमलाही सक्रीय करते. वैज्ञानिकांनी 40 जणांवर या इंजेक्शनचे परीक्षण केले आहे.

Related Stories

मोदी सरकार 2024 पर्यंत सत्तेत राहणार नाही

datta jadhav

लोकसभेत काँग्रेसचे 7 खासदार निलंबित

tarunbharat

पासवान यांचे कार्यकर्त्यांना भावनिक पत्र

Patil_p

तीन महिन्यांनंतर मिळणार ‘कोव्हिशिल्ड’चा दुसरा डोस

Amit Kulkarni

ग्रामपंचायतीचे फर्मान, 300 श्वानांची हत्या

Patil_p

निर्भया केस : एका आरोपीकडून क्युरेटिव्ह याचिका दाखल

prashant_c
error: Content is protected !!