महापौर रोहित मोन्सेरात यांचे प्रशंसोद्गार
प्रतिनिधी /पणजी
कल्पकता आणि डिझाइन तसेच व्यक्तिमत्वचा दोलायमान स्पर्श यांचा अनोखा संगम असलेल्या सोने, हिरे आणि चांदीच्या दागिन्यांच्या प्रदर्शनाचे महापौर रोहित मोन्सेरात यांच्याहस्ते शुक्रवारी पणजीत उद्घाटन करण्यात आले.
बंगळुरू येथील प्रसिद्ध क्रिशनैया चेट्टी ग्रुप ऑफ ज्वेलर्सतर्फे खास गोमंतकीयांसाठी आयोजित हे प्रदर्शन 20 ते 23 मे दरम्यान पणजीत हॉटेल फिदाल्गो येथे भरविण्यात आले आहे. ग्राहकांसाठी खास क्मयुरेट केलेले त्यांचे अत्यंत मोहक दागिने दाखवणारे हे प्रदर्शन सकाळी 10.30 ते रात्री 8 या वेळेत खुले राहणार आहे. उद्घाटनप्रसंगी मनपा आयुक्त आग्नेलो फर्नांडिस यांचीही उपस्थिती होती.
नीलमणी, सिट्रीन, मोती, अमेथिस्ट, माणिक यांसारख्या दुर्मिळ रत्नांसह उत्कृ÷ डिझाईन्स तसेच सुरेख हिऱयांचे कलेक्शन ग्राहकांच्या क्लासिक शैलीमध्ये अभिजात आणि स्त्रीत्वाची भावना आणणार आहे, असे प्रतिपादन कंपनीचे कार्यकारी संचालक चैतन्य कोथा यांनी केले. गुणवत्ता किंवा नैतिकतेशी तडजोड न करता, खरेदी करण्यापेक्षा अधिक मिळवण्यासाठी यापेक्षा चांगली वेळ नाही, असे ते पुढे म्हणाले. या प्रदर्शनादरम्यान ग्राहकांसाठी अनेक सवलती तसेच अतिरिक्त फायदे त्यांनी जाहीर केले. दरम्यान, हेच येत्या दि. 25 मे रोजी याच प्रदर्शनाचे मडगावात आयोजन करण्यात आले आहे. तेथील नानूटेल हॉटेलात दोन दिवसांसाठी ते भरविण्यात येणार आहे, अशी माहितीही कोथा यांनी दिली.