सावंतवाडी / प्रतिनिधी-
श्री पंचम खेमराज महाविद्यालयात हिस हायनेस्ट श्रीमंत शिवरामराजे भोसले यांचा ९५ वा जयंती संस्थापक दिन शनिवारी १३ ऑगस्टला साजरा करण्यात आला. यावेळी, मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ संजय देशमुख ,संस्थेचे अध्यक्ष खेमसावंत भोसले ,संस्थेचे प्राचार्य डॉ भारमल , संस्थेचे विश्व्स्त युवराज लखम राजे भोसले ,ऍड श्यामराव सावंत , सामाजिक कार्यकर्ते वसंत उर्फ अण्णा केसरकर, अन्वर खान तसेच महाविद्यालयाचे सर्व प्राचार्य , विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रमुख पाहुणे व मान्यवरांचे स्वागत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ . डी .एल भारमल सर यांनी केले. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्व्लन करण्यात आले. माजी कुलगुरू डॉ. संजय देशमुख यांनी नवीन शैक्षणिक धोरण व उच्च शिक्षणाच्या नवीन संधी याबद्दल विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. सामाजिक कार्यकर्ते वसंत उर्फ अण्णा केसरकर यांनी यावेळी आपलं मत व्यक्त केलं
.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा .डॉ . प्रगती नाईक यांनी केले तर, आभार प्रा. कविता तळेकर यांनी मानले.