दापोली/प्रतिनिधी
दापोली तालुक्यात होऊ घातलेल्या पंचायत समिती निवडणुकीची बुधवारी होणारी आरक्षण सोडत अतिवृष्टीमुळे रद्द करण्यात आली आहे.
दापोलीत पंचायत समितीच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. या निवडणुकीचे आरक्षण जाहीर करण्याकरिता बुधवारी दापोली तहसील कार्यालयात शिवाजी सभागृहात दुपारी 12 वा. ही आरक्षण सोडत होणार होती. मात्र रत्नागिरी जिल्ह्यात होत असलेल्या अतिवृष्टीचे कारण देत ही आरक्षण सोडत रद्द करण्यात आली असल्याचे दापोली तहसील कार्यालयातून कळवण्यात आले आहे. यामुळे अनेकांचा हिरमोड झाला आहे.