Tarun Bharat

पंचायत सचिवाला वाचता येत नाही मराठी!

ग्रामस्थ आक्रमक, अखेर तिवरे वरगांव ग्रामसभा रद्द : बिल्डरचे प्रतिज्ञापत्र गहाळच्या मुद्यावर ग्रामसभा गाजली

वार्ताहर /माशेल

माशेल येथील तिवरे-वरगांव पंचायतीच्या सचिवाला मराठी भाषेतील इतिवृत्तांत वाचता  येईना या विषयावरून सुरू झालेल्या ग्रामसभेत शिवानी बिल्डर्सने उभारलेल्या बेकायदेशीर कंपाऊड भिंतीबाबत तिवरे वरगांव पंचायतीच्या ग्रामस्थांनी घेतलेली आक्रमकतेवर निरूत्तर झालेल्या सरपंच व सचिवानी अखेर ग्रामसभा रद्द करीत काढता पाय घेतल्यामुळे ग्रामसभा गाजली.

  सरपंच उन्नती नाईक यांच्या अध्यक्षतेखाली काल रविवारी सकाळी 11.30 वा. सुमारास तिवरे वरगांव ग्रामसभेला सुरूवात झाली. सुरवातीला सचिव रजत नार्वेकर यांनी उपस्थित ग्रामस्थांचे स्वागत केले. यावेळी त्यांनी आपल्याला मराठी भाषा वाचायला येत नसल्याले मागील सभेचे इतिवृत्तांत पंचसदस्य संकेत आमोणकर याना वाचायला दिले. पंचायतीच्या ग्रामसभेत पुर्वीपासून सर्व वृत्तांत मराठीत लिहिले जात असल्याची माहिती ग्रामस्थातर्फे देण्यात आली. त्यानंतर ग्रामस्थाच्या प्रश्नाना समर्पक उत्तरे न देताच पंचायतीचे सचिव रजत नार्वेकर व सरपंच यांनी सभा रद्द करण्यात येत असल्याचे सांगून ग्रामसभेतून काढता पाय घेतला.  आक्रमक झालेल्या ग्रामसभेला पोलीसानाही पाचारण करण्यात आले.

    संरक्षक भिंत उभारणीचे प्रतिज्ञापत्र कुठे आहे? ग्रामस्थाची मागणी

  संकेत आमोणकर यानी इतिवृत्तांत वाचताना गेल्या ग्रामसभेत उपस्थित शिवानी बिल्डर्स यांच्या ओहोळाला लागून असलेल्या संरक्षक भिंतीवर कारवाई करण्यात यावी असे गेल्या ग्रामसभेत मंगेश गावकर यांनी हा मुद्दा उपस्थित केला होता. इतिवृत्तांत वाचन असतानाच मंगेश गावकर यानी या बेकायदेशीरित्या उभारण्यात आलेल्य़ा संरक्षक भिंतीवर कोणती कारवाई केली आहे असा प्रश्न उपस्थित केला. तेव्हा संबंधित प्रभागाचे पंच पाईक गावडे म्हणाले या संरक्षक भिंतीविषयी मालकांनी प्रतिज्ञापत्र दिले आहे. त्यात त्यांनी आपण जर दोषी असेल तर भिंत मोडेन असे सांगितल्याची माहिती दिली. यावेळी मंगेश गावकर व इतर ग्रामस्थांनी प्रतिज्ञापत्र दाखविण्याची मागणी केली सर्वप्रथम सरपंच उन्नती नाईक नंतर त्या प्रभागाचे पंच पाईक यानी प्रतिज्ञापत्र दाखविण्याची मागणी केली. ग्रामस्थानी जोर लावत सचिवाकडे प्रतिज्ञापत्र दाखवा अशी फेरमागणी करताच सचिव रजत नार्वेकर ग्रामस्थावर भडकले.

    पंचायत सचिव मराठीबाबत अज्ञान, अतिवृत्त वाचता येईना

   ग्रामिण भागातील ग्रामस्थांना ग्रामसभेतील इतिवृत्तात योग्यप्रकारे समजावा यासाठी बऱयाच पंचायती मराठी भाषेचा अवलंब करीत आलेले आहे. तीच भाषा पंचायतीच्या सचिवाला समजत नसल्यामुळे ग्रामस्थानी आ़श्चर्य व्यक्त केले. त्यानंतर ग्रामहिताचे प्रश्न विचारल्यानंतर त्याचे उत्तर देण्याऐवजी ग्रामस्थावर भडकणे ही भाषा एखाद्या सरकारी अधिकाऱयाला शोभत नसल्याची प्रतिक्रिया संपत्प ग्रामस्थांनी दिली. सचिव रजत नार्वेकर यांना उपस्थितांनी जाब विचारली. या चर्चेत शेखर गावकर, भारत जल्मी, ओमकार आमोणकर, शिवम आमोणकर यानी प्रतिज्ञापत्र दाखवा असा आग्रह धरला. पुर्वीच्या सचिवांनी सुद्धा ग्रामसभेत कागदपत्रे दाखवली होती. तुम्हीच का दाखवत नाही असा प्रतिप्रश्न उपस्थित केला.

    सचिव, सरपंचचा बिल्डर्सला पाठिंबा; कारण गुलदस्त्यात

   ग्रामस्थांनी प्रतिज्ञापत्राची मागणीवेळी पंचायत कार्यालय जवळ असून कार्यालयातून मागवून आणा अन्यथा मूळ प्रतिज्ञापत्राची प्रत तरी दाखवा किंवा पंचायत रजिस्टर्डमधील नोंदी नंबर दाखविण्यासाठी आग्रह केला. याच कारणावरून पुढील कोणतेच कामकाज न करता ग्रामसभा रद्द करण्यात आल्याची सरपंचानी सुनावल्याने ग्रामस्थही भडकले.  संतापलेल्या ग्रामस्थांना प्रवेशद्वाराजवळ रोखून धरण्यात आले. मात्र त्यानंतर सचिव रजत नार्वेकर, सरपंच उन्नती नाईक व पंचसदस्य संकेत आमोणकर यांनी गर्दीतून वाट काढत ग्रामसभेतून काढता पाय घेतला. यावेळी उपसरपंच सिद्धा गाड, माजी उपसरपंच जयेश नाईक, सुशांत गावकर, मनमिता गावडे, पाईक गावडे आपल्या जाग्यावर बसून होते.

पंचायत सचिव भडकणे कीती योग्य   

ग्रामसभेच्या इतिहासात पहिल्यांदाच एखादा पंचायत सचिव ग्रामस्थाना अरेरावीच्या भाषेत खडे बोल सुनावत असल्याचा प्रकार घडल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. सचिव हा सरकारी अधिकरी म्हणून त्याना जाणीव करण्याची वेळ ग्रामस्थावर आली. बेकायदेशीर भिंत उभारण्यासाठी कुणी परवानगी दिली. त्याविषयी सोपस्कर पुर्ण कोणाच्या मर्जीनुसार झाले. प्रतिज्ञापत्र व कायदेशीर कागदपत्रे ग्रामसभेत सादर केल्यानंतर ग्रामसभेचे कामकाज होऊ द्या असा पवित्रा ग्रामस्थांनी घेतल्याने शेवटी कोणत्याही चर्चेविना नाटय़मय घडामोडीत सभा रद्द करण्यात आली. मागील काही ग्रामसभेत कोणतीही चर्चेविना ग्रामसभा रद्द करण्याचे सत्रच सुरू झालेले आहे.

Related Stories

आठ अधिकाऱयांना आयएएस केडरमध्ये बढती

Patil_p

खाणी सुरू करण्यासाठी आता दिल्लीत बैठक

Patil_p

केपेतून भाजपचे बाबू कवळेकर, आरजीचे विशाल देसाई यांचे अर्ज

Patil_p

निवडणूक जवळ आल्याने जनतेला नुसती आश्वासने देऊ नका : खा. सार्दीन

Omkar B

मोपावर विमानाचे पहिले ‘लँडिंग’ यशस्वी

Amit Kulkarni

लोकांचा विश्वासघात करण्याची ताकद माझ्यात नाही

Amit Kulkarni