पावसाचा जोर कायम : बुधवारी रेड अलर्ट, महापूराचा धोका : नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा : 53 बंधारे पाण्याखाली
प्रतिनिधी/कोल्हापूर
जिह्याच्या धरणक्षेत्रात पावसाचा जोर कायम असून मंगळवारी सकाळपासूनच नद्यांची पाणीपातळी झपाटय़ाने वाढत आहे. 53 बंधारे पाण्याखाली गेले आहेत. पंचगंगेची पाणीपातळी 34.5 फुटापर्यंत पोहोचली असून इशारा पातळीकडे वाटचाल सुरु आहे. हवामान विभागाने बुधवारी (13 रोजी) रेड अलर्ट जाहीर केल्यामुळे महापूराचा धोका आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासन अलर्ट झाले आहे. करवीरमधील चिखलीसह नदीकाठच्या गावांतील लोकांना स्थलांतरीत होण्याच्या सूचना दिल्या आहेत. राधानगरी धरणातून 1350 क्युसेक विसर्ग सुरु आहे.
अतिवृष्टी आणि महापूराचा धोका ओळखून प्रशासन सतर्क झाले आहे. पुढील तीन दिवस जोरदार पावसाची शक्यता असल्यामुळे तालुकानिहाय अधिकाऱयांची नियुक्ती करून उपाययोजना करण्याचे निर्देश दिले आहेत. गावपातळीवरील तलाठी, ग्रामसेवक, कृषी अधिकारी यांच्यासह संबंधित अधिकाऱयांना पाऊस आणि पूरस्थितीबाबत माहिती कळविण्याच्या सूचना दिल्या आहेत.
गगनबावड्य़ात सर्वाधिक 111.9 मिमी पाऊस
गेल्या 24 तासांत गगनबावडा तालुक्यात सर्वाधिक 111.9 पावसाची नोंद झाली असून हातकणंगले- 15.1, शिरोळ -8.7, पन्हाळा- 38.2, शाहूवाडी- 81.9, राधानगरी- 63.4, गगनबावडा-111.9 , करवीर- 33.5 , कागल- 33.2 , गडहिंग्लज- 18.4, भुदरगड- 48.5, आजरा-43, तर चंदगड तालुक्यात 72.9 पावसाची नोंद झाली आहे.
53 बंधारे पाण्याखाली
पंचगंगा नदीवरील- शिंगणापूर, राजाराम, सुर्वे, रुई, इचलकरंजी, तेरवाड व शिरोळ, भोगावती नदीवरील- हळदी, सरकारी कोगे, राशिवडे व शिरगांव, कासारी नदीवरील- वालोली, यवलूज, पुनाळ तिरपण, ठाणे आळवे, बाजारभोगाव व पेंडाखळे, कडवी नदीवरील-सवते सावर्डे, शिरगांव, सरुड पाटणे व कोपार्डे, वेदगंगा नदीवरील- कुरणी, बस्तवडे, चिखली, निळपण, वाघापूर, म्हसवे व गारगोटी, घटप्रभा नदीवरील- कानर्डे सावर्डे, वारणा नदीवरील- चिंचोली, माणगांव, कोडोली, तांदूळवाडी, शिगांव, खोची,मांगले सावर्डे व चावरे, दुधगंगा नदीवरील- दत्तवाड, सुळकुड व सिध्दनेर्ली, कुंभी नदीवरील- शेणवडे व कळे, तुळशी नदीवरील- बीड, आरे व बाचणी, ताम्रपर्णी नदीवरील- कुर्तनवाडी व चंदगड, धामणी नदीवरील- सुळे, पणुरे व आंबर्डे असे 53 बंधारे पाण्याखाली आहेत.
धरण पाणीसाठा (टक्के)
धरण पाणीसाठा
राधानगरी 56
तुळशी 54
वारणा 56
दूधगंगा 47
कासारी 67
कडवी 60
कुंभी 57
पाटगाव 55
चिकोत्रा 56
चित्री 56
जंगमहट्टी 50
घटप्रभा 100
जांबरे 100
आंबेओहोळ 69
कोदे ल.पा. 100