Kolhapur Rain Update : कोल्हापूर शहर आणि जिल्ह्यामध्ये गेली दोन दिवस मुसळधार पाऊस सुरु आहे. यामुळे नद्यांच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ झाली आहे. नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने दुपारी बारा पर्यंत जिल्ह्यातील ३६ बंधारे पुन्हा पाण्याखाली आले आहेत. दुपारपर्यंत पाणीपातळी २६ फुट ८ इंच, इशारा पातळी – ३६ फुट तर धोकापातळी ४३ फुट आहे.
काल राधानगरी धरणाचे तीन स्वयंचलित दरवाजे काही तासांमध्ये उघडले होते. दरम्यान, आज सकाळी 6 व्या क्रमांकाचा दरवाजा बंद झाला आहे. सध्या राधानगरी धरणाचा 4 व 5 वा दरवाजा खुला आहे. धरणातून भोगावती नदी पात्रात 4 हजार 456 क्युसेकने विसर्ग सुरु आहे.
जिल्ह्यातील कोणत्या बंधाऱ्यांवर पाणी?
पंचगंगा नदी – शिंगणापूर, राजाराम, रुई, इचलकरंजी, तेरवाड, शिरोळ
भोगावती नदी – कोगे, राशिवडे, हळदी
तुळशी नदी – बीड
कासारी नदी – यवलूज, ठाणे, आळवे
दुधगंगा नदी – सिद्धनेर्ली, दत्तवाड, सुळकूड
ताम्रपर्णी नदी – चंदगड, कुर्तनवाडी
घटप्रभा नदी – पिळणी, बिजूर भोगाली, कानडे सावर्डे, हिंडगाव
वेदगंगा नदी – निळपण, वाघापूर, कुरणी, बस्तवडे, चिखली
हिरण्यकेशी नदी – निलजी, ऐनापूर, गिजवणे, साळगांव


previous post