Tarun Bharat

Pandharpur By Election Result 2021 Updates: ३७३३ मतांनी भाजपाचे समाधान अवताडे विजयी

Advertisements

तरुण भारत संवाद प्रतिनिधी / पंढरपूर

पंढरपूर पोटनिवडणुकीत भाजप व राष्ट्रवादी असा काट्याचा सामना झाला. यामध्ये भाजपचे समाधान आवताडे यांनी ३७३३ मतांची आघाडी घेत विजय मिळवला.

३७३३ मतांनी भाजपाचे समाधान अवताडे विजयी

या मतदारसंघात प्राथमिक फेऱ्यात फक्त राष्ट्रवादी काँग्रेसचे भगीरथ भालके यांनी आघाडी घेतली होती. त्यानंतर पंढरपूर शहराचे मतदान सुरू झाल्यानंतर अवताडे यांनी मतांची आघाडी शेवटपर्यंत कायम ठेवली. पंढरपूर शहर आणि तालुक्यामध्ये एक हजार बावीस मतांची आघाडी घेत त्यांनी मंगळवेढात प्रवेश केला. मंगळवेढा शहरात अवताडे यांना चांगले मताधिक्य मिळाले. तर मंगळवेढ्यातील ग्रामीण भागात अवताडे आणि भालके असा काट्याचा सामना रंगला. सरतेशेवटी अवताडे यांनी आघाडी घेतली. पोस्टल मतांमध्ये देखील आवताडे यांनी आपली आघाडी कायम ठेवली आणि राष्ट्रवादीचे भगीरथ भारत भालके यांचा पराभव केला.

पंढरपुरात भाजपाने आमदार प्रशांत परिचारक यांची मोठी ताकद समाधान आवताडे यांच्या पाठीमागे उभी केली होती. परिणामी या ताकतीचा उपयोग अवताडे यांच्या विजयात मोठा असल्याचे दिसून येत आहे.

पंढरपूर पोटनिवडणुकीत भाजप व.राष्ट्रवादी असा काट्याचा सामना झाला. यामध्ये भाजपचे समाधान आवताडे यांनी ३७३३ मतांची आघाडी घेत विजय मिळवला.

या मतदारसंघात प्राथमिक फेर्यात फक्त राष्ट्रवादी काँग्रेसचे भगीरथ भालके यांनी आघाडी घेतली होती. त्यानंतर पंढरपूर शहराचे मतदान सुरू झाल्यानंतर अवताडे यांनी मताची आघाडी शेवटपर्यंत कायम ठेवली. पंढरपूर शहर आणि तालुक्यामध्ये एक हजार बावीस मतांची आघाडी घेत त्यांनी मंगळवेढात प्रवेश केला. मंगळवेढा शहरात अवताडे यांना चांगले मताधिक्य मिळाले. तर मंगळवेढ्यातील ग्रामीण भागात अवताडे आणि भालके असा काट्याचा सामना रंगला. सरतेशेवटी अवताडे यांनी आघाडी घेतली. पोस्टल मतांमध्ये देखील आवताडे यांनी आपली आघाडी कायम ठेवली. आणि राष्ट्रवादीचे भगीरथ भारत भालके यांचा पराभव केला.

पंढरपुरात भाजपाने आमदार प्रशांत परिचारक यांची मोठी ताकद समाधान आवताडे यांच्या पाठीमागे उभी केली होती. परिणामी या ताकतीचा उपयोग अवताडे यांच्या विजयात मोठा असल्याचे दिसून येत आहे.

Related Stories

मोदी सरकार व जिल्हा प्रशासनास कांदा, भाजीपाला भेट देऊन केले अनोखे आंदोलन

Abhijeet Shinde

सोलापूर : जिल्हाधिकारी कार्यालयात युवकाचा आत्मदहनाचा प्रयत्न

Abhijeet Shinde

आषाढी वारी नसली तरी फेसबुकवर ज्ञानेश्वरी ग्रंथावर निरूपण

Abhijeet Shinde

सोलापूर जिल्हा परिषदेतील १० हजार कर्मचाऱ्यांची सेवापुस्तक अद्ययावत

Abhijeet Shinde

हे जनतेचं सरकार आहे, कोणालाही वाऱ्यावर सोडणार नाही

Abhijeet Shinde

महिलांची घागरभर पाण्यासाठी भटकंती

Abhijeet Shinde
error: Content is protected !!