प्रतिनिधी / बेळगाव
श्री चिदंबरदास राजाराम महाराज व पांडुरंग महाराज समाधी गोवावेस बेळगाव (श्री संस्थान शांताश्रम मठ हळदीपूर यांची बेळगाव शाखा) येथील श्री पांडुरंग महाराज समाधीचा प्रतिष्ठापना महोत्सव व कळसारोहण प. पू. श्री. श्री. वामनाश्रम स्वामीजींच्या हस्ते दि. 25 रोजी झाला. श्री. श्री. वामनाश्रम स्वामीजींच्या आशीर्वचन व फल मंत्राक्षतानंतर महाप्रसादाने उत्सवाची सांगता झाली.
या महोत्सवाला गोवा, कोकण, हल्याळ, खानापूर, बिडी, नंदगड व बेळगाव येथील वैश्य समाज बांधव तसेच श्री चिदंबरदास राजाराम महाराज व पांडुरंग महाराज भक्तगण बहुसंख्येने उपस्थित होते.
उत्सव यशस्वी करण्यासाठी बेळगाव शाखा अध्यक्ष बापूसाहेब अनगोळकर व विशाल मुरकुंबी, सुभाष अंगडी, श्याम नाकाडी, सुरेंद्र मिठारी, काशिनाथ कुदळे, सोमशेखर नाकाडी, मधुसूदन किनारी, गजानन गावडे, सुनीता हणमशेट, प्रतिभा हणमशेट, उज्ज्वला बैलूर, रंजनी मुरकुंबी, प्रियांका मुरकुंबी, अनिता गौंडळकर, सुमती कुदळे यांच्यासह सदस्य व कार्यकारी मंडळाने परिश्रम घेतले.