अतिउत्साह बेततोय जिवावर, डीपी तरुणाईला वेड
अबिद मोकाशी, पन्हाळा
Panhala Fort Tourism : पन्हाळगडाची ख्याती सर्वदुर आहे.याठिकाणी हिवाळा,उन्हाळा किंवा पावसाळ्यात वातावरणा नेहमीच आल्लादायक असते.यामुळे पर्यटकांची पसंती पन्हाळ्याला नेहमीच असते.शनिवार व रविवार सुट्टीच्या दिवशी तर पर्यटकांचे जथ्थे गडाकडे येताना नजरेस पडतात.निसर्गाच्या सान्निध्यात जात असताना त्याचा मनसोक्त आनंद घेण्यासाठी प्रत्येकजण आसुसलेला असतो.मात्र,या ठिकाणी आवश्यक ती खबरदारी न घेतल्याने जिवावर बेतणारे प्रसंगही उद्भवु लागले आहेत.भान हरपुन निसर्ग कॅमेऱ्यात कैद करण्याच्या नादात अनेकांना जिवाला मुकण्याची वेळ आल्यावरच शहाणपणा येणार काय.. असा प्रश्न पन्हाळ्यात स्टंटबाजी करणाऱ्यांच्या बाबतीत पडत आहेत.
आज विविध पर्यटन स्थळांच्या ठिकाणी स्टंटबाजी केल्याने अनेक युवकांना आपले प्राण गमवावे लागल्याची घटना समोर येत आहेत.सध्या पन्हाळगडावर तरुणाईचा घोळका मोठ्या संख्येने पर्यटनासाठी येत असल्याचे दिसुन येत असुन व्हाँट्सअप,फेसबुकवर डिस्पले पिक्चर,प्रोफाईल पिक्चरसाठी धोकादायक ठिकाणी बेभान होऊन थ्रील करत सेल्फी करण्यात मग्न होत आहेत.प्रत्येक तरुणाईला आपल्या डीपीवरील पिक्चरचे इतराकडुन कौतुक व्हावेसे वाटत असुन डीपी सर्वापेक्षा वेगळा कसा असेल? यासाठी फोटो सेशम करताना जीवावरचा धोका पत्करत असतानाचे पन्हाळ्याच्या तटबंदीवर सर्रास द्रुश्य नजरेस पडत आहे.
अधिक वाचण्यासाठी- World Architecture Day Special : पन्हाळा म्हणजे पुरातत्व शास्त्रा समोरचे आव्हान…
अतिउत्साहात तरुणाईचा व्हाँट्सअँप,फेसबुकवर आपला डीपी इतरांहुन वेगळा कसा असेल,या हेतुने अनेक विविध पोझ देऊन सेल्फी फोटो सेशन करण्यासाठी अधिक कल दिसतो.अंधारबाव ते तीन दरवाजा दरम्यान असलेल्या कठड्यावर उभे राहुन,धोकादायक खोली असणाऱ्या व कसलाही आधार नसणाऱ्या उंच कड्यावर तरुणाई आपल्या मित्रांसमवेत सेल्फी,फोटो सेशन करताना बेभान होऊन आपण सुरक्षित आहोत की नाहीत याचे जरादेखील भान तरुणाईला राहत नसुन,जीव धोक्यात घालुन डीपीवर आगळावेगळा डिस्प्ले पिक्चर डाऊनलोड करण्यासाठी गुंग होत आहेत.गडावर ठिकाठिकाणी निसरड्या जागा,तटबंदीवर आधाराविना वैयक्तिक,सामुहिक सेल्फी-फोटो सेशनमुळे तोल न सावरल्यास,माहित नससलेल्या जागांचा अंदाज न आल्यास जीवावर बेतण्याची शक्यता आहे.त्यातच पन्हाळ्यातील मार्गावर दुचाकी,चारचाकी सुसाट धावत असताना तरुणाई जीवाची पर्वा नकरता रस्त्यात झोपुन तसेच आपली दुचाकी भररस्त्यात उभी करुन विविध अँगलने क्षण कँमेऱ्यात टिपत असताना दिसत आहे.
निसर्ग कँमेऱ्या त आणि पर्यटक दवाखान्यात
निसर्गात जाताना आपल्यासोबत गरजेच्या,सुरक्षेच्या आवश्यक वस्तु घेण्याचा विचार बहुतांश पर्यटक करीत नाहीत. बाहेर जायचं म्हंटल की मोबाईल चार्ज करणे आणि पाँवरबँक सोबत असणे याला सार्वाधिक पसंती दिली जाते. निसर्गात गेल्यानंतर त्याचा आनंद उघड्या डोळ्यांनी घेण्यापेक्षा तो कँमेऱ्यात कैद करण्याकडेच अनेकाचा कल असतो.परफेक्ट पिक्चर घेण्याच्या नादात वाट्टेल ते धाडस करण्याची पर्यटकांची मानसिकता असते.त्यामुळे निसर्ग कँमेऱ्यात आणि पर्यटक दवाखान्यात अशी स्थिती अनेक सहलींची पाहायसा मिळेल.
उपाययोजना गरजेची
पन्हाळ्यात पर्यटकांची मोठी गर्दी असते.गडावरच्या तटबंदीवर दरीच्या बाजुने सेल्फी,फोटो सेशन करणे धोकादायक असुन संरक्षणासाठी कोणतीही काळजी घेतली जात नाही.अंधारबाव ते तीन दरवाजा दरम्यानच्या कठड्यांवर फोटोशेसनसाठी गर्दी दिसुन येत असते.यावर उपाययोजना करणे गरजे आहे.
अल्ताफ अत्तार(स्थानिक नागरिक)