Tarun Bharat

Kolhapur; पन्हाळा-पावनगड रस्त्यावर पुन्हा दरड कोसळली

Advertisements

पन्हाळा-प्रतिनिधी

 पन्हाळा- पावनगड रस्त्यावर आज सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास पुन्हा भूस्खलन झाले. गेल्या चार दिवसांत हे दुसरे भूस्खलन असून, हा मार्ग वाहतूकीसाठी धोकादायक बनला आहे. पन्हाळा पावनगड रस्ता गेली 100 हून अधिक वर्षे अस्तित्वात आहे. पावनगड येथील ग्रामस्थांना वाहतुकीसाठी हा एकमेव असा मार्ग आहे. गेल्यावर्षी पन्हाळ्याच्या मुख्य रस्त्यावर भूसखलन झाल्यामुळे पन्हाळा वर्षभर बंद करण्यात आला होता. तेव्हा येथील नागरिकांना वाहतुकीसाठी हाच पर्यायी मार्ग होता.

पन्हाळ्याचा मुख्य रस्ता बंद झाल्यानंतर पन्हाळा नगरपालिकेने बुधवार पेठेतून पन्हाळगडावर दुचाकीसाठी पर्यायी रस्ता तयार केला होता. या रस्त्यावरून दुचाकी वाहने नेण्यात यावी, म्हणून तत्कालीन नगरपालिका प्रशासनाने जाहीर आदेश काढला. जकात नाक्याची टपरी या प्रवेशद्वारावर बसवली त्यानंतर या रस्त्याने नियमित वाहतुक सुरू झाली. या रस्त्यावर अवजड वाहने नेऊ नयेत असे नियम असताना देखील स्वत: नगरपालिकेनेच स्वतः येथील मार्गावरून अवजड वाहनांची वाहतूक सुरू केली. या घटनेची पन्हाळ्यातील माजी नगराध्यक्ष असिफ मोकाशी यांनी मुख्याधिकारी स्वरूप खारगे यांच्याकडे केली होती.

नगरपालिकेने स्वत: अवजड मालाची वाहतूक केल्यानंतर पुन्हा याठीकाणाहून ट्रक, ट्रॅक्टर, टेम्पो, सिमेंटचे ट्रक अशी अवजड वाहतूक सुरू झाल्याचे येथील नागरिक सांगतात. या रस्त्यावरून सतत सुरू असलेल्या वाहतुकीमुळेच हा रस्ता धोकादायक बनला आहे. या मार्गावरून अवजड वाहतूक होत राहिल्याने रस्त्याच्या ढिसूळ झालेल्या मातीचे भूसखलन होत आहे. वरून कोसळणाऱ्या दरडीमुळे या दरडीखाली असणारा पन्हाळा मुख्यरस्ता देखील असुरक्षित बनला आहे.

सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने उपाययोजना करणे आवश्यक
याठिकाणी भल्या मोठ्या दगडी शिळा आहेत, त्यामध्ये पाणी शिरून व माती सुटली तर पन्हाळा रस्ता कायमचा बंद होईल ही भीती आहे. यावरून पन्हाळ्याचा विशाळगड व्हायला वेळ लागणार नाही अशी भीती नागरिकांकडून व्यक्त होत आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने याबाबत तातडीने उपाय योजना करणे आवश्यक आहे. पन्हाळा मुख्य रस्त्यावर उड्डाणपूल उभारण्यात यावा यासाठी अहवाल तयार करण्यात आला आहे, पण हा अहवाल शासनाकडे धूळ खात पडला असल्याचे समजते. शासनाने वेळीच लक्ष्य घालून या रस्त्याबाबत तातडीने उपाय योजना करावी आशी मागणी पावनगड येथील नागरिकांच्या वतीने करण्यात येत आहे.

Related Stories

वारणा महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी डॉ. डी. टी. शिर्के यांचा कुलगुरूपदी निवड झाल्याबद्दल सत्कार

Abhijeet Shinde

संभाव्य महापुराच्या पार्श्वभूमीवर कुरुंदवाड शहरात सर्वेक्षणाचे काम सुरू

Abhijeet Shinde

उपजिल्हाधिकारी धुमाळ, पांगारकर यांची बदली

Abhijeet Shinde

गोकुळचा दूध विक्रीत विक्रम

Abhijeet Shinde

एसटी हिंसाचारप्रकरणी पन्नासपेक्षा अधिक गुन्हे दाखल

Sumit Tambekar

एस टी संपात अश्रूंचा फुटला बांध…

Abhijeet Shinde
error: Content is protected !!