ऑनलाईन टीम/तरुण भारत
बऱ्याच वेळा आपण राजकीय नेते, अभिनेते, प्रसिद्ध व्यक्ती आणि राजकीय पक्षांची ट्विटर अकाऊंट हॅक (Twitter handle hacked) झाल्याचे ऐकले आहे. आज पुन्हा पंजाब काँग्रेसचे (Panjab congress) अधिकृत ट्वीटर अकाऊंट हॅक झाल्याचे समजत आहे. अकाऊंट हॅक झाल्यांनतर या अकाऊंटद्वारे वेगवेगळे ट्वीट केले जात आहेत. तर ट्विटर अकाऊंट हॅक झल्याचे समजताच काँग्रेसकडून लवकरात लवकार अकाऊंट रिस्टोर करण्याचा प्रयत्न केला जात आहे. हॅकर्सने पंजाब काँग्रेसच्या ट्विटर अकाऊंटचा डीपी आणि बँकग्राउंड फोटो बदलला असून शेकडो युजर्सना टॅग करून भरपूर ट्वीट्स केले आहेत. तसेच हॅकर्सने पंजाब काँग्रेसच्या ट्वीटर अकाऊंटवर पक्षाचे माजी अध्यक्ष आणि नेते राहुल गांधींचा (Rahul Gandhi) एक फोटो पोस्ट केला आहे. राहुल गांधी यांचा फोटो पोस्ट करून हॅकर्सने कॅप्शनमध्ये ‘सच भारत’ असे लिहिले आहे. दोन दिवस झाले देशातील ट्विटर अकाऊंट हॅक केली जात आहेत.
दरम्यान, हॅकर्सने 72 तासांत देशातील चौथे ट्वीटर अकाऊंट हॅक केले आहे. यापूर्वी हॅकर्सने 10 एप्रिलला विद्यापीठ अनुदान आयोग (UGC) भारत आणि 9 एप्रिलला उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आणि भारताच्या हवामान खात्याचे ट्वीटर अकाऊंट हॅक केले होते.