Tarun Bharat

स्वाध्याय परिवारातर्फे पणजीत रक्षाबंधन, नारळी पौर्णिमा उत्सव

Advertisements

प्रतिनिधी /पणजी

श्रीमद्भगवतगीता पाठशाळा माधवबाग, मुंबई येथे गीतेवर अविरत प्रवचन देत पद्मविभूषण परम पूजनीय पांडुरंगशास्त्री आठवले (दादा) यांनी त्रिकालसंध्येतून स्मृती, शक्ती, शांतीचा संदेश समजावत दैवी वैश्विक स्वाध्याय परिवार उभा केला. पूजनीय दादांच्या या वैश्विक स्वाध्याय परिवाराची धुरा सध्या त्यांची सुकन्या पूजनीय श्रीमती धनश्री तळवलकर (दीदी) या परिवाराची मोठी बहिण बनून समर्थपणे संभाळत आहेत. श्रावणी पौर्णिमा उत्सवानिमित्त त्या गोव्यातील स्वाध्याय परिवाराला भेटण्यासाठी गुरूवार दि. 11 ऑगस्ट रोजी येत आहेत. त्यानिमित्त स्वाध्याय परिवारातफ्Xढ रक्षाबंधन, नारळी पौर्णिमा उत्सव पणजी येथील कांपाल मैदानावर सायंकाळी 5 वाजता आयोजित केला आहे.

या उत्सवासाठी गोव्यासह महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी, कोल्हापूर, व कर्नाटकातील बेळगाव, कारवार जिह्यातील हजारो स्वाध्यायी उपस्थित राहणार आहेत.

भारतीय संस्कृतिने दिलेल्या विविध उत्सवांपैकी रक्षाबंधन हा एक पवित्र उत्सव आहे. समाजातील स्त्रीकडे पाहण्याचा दृष्टीकोन पवित्र बनविण्याचा, बहिणीच्या रक्षणाची जबाबदारी भावाला समजावणारा आणि भाऊ बहिणींच्या विशुध्द प्रेमाचा संदेश देणारा हा उत्सव आहे. हा उत्सव नारळी पौर्णिमा म्हणूनही साजरा केला जातो. विविध रत्नांची खाण असणारा, अब्जावधी जीवांना संभाळणाऱया व संपूर्ण सृष्टीला जल पुरविणाऱया सागराला श्रीफ्ढळ अर्पण करून पूजन केले जाते. स्वाध्याय परिवार या दिवशी सागराचे कृतज्ञतापूर्वक पूजन करतो. या रक्षाबंधन, नारळी पौर्णिमा उत्सवाला तमाम गोमंतकीयांनी उपस्थित रहावे, असे  स्वाध्याय परीवारतफ्xढ कळविण्यात आले आहे.

Related Stories

इंडियन न्यूज पेपर सोसायटीच्या कार्यकारी समिती सदस्यपदी किरण ठाकुर

Amit Kulkarni

आगीशिवाय धूर येत नाही

Amit Kulkarni

आम्हा शिक्षकांना कुणी वाली आहे का ?

Amit Kulkarni

झुआरी पुलावर पाच तास ‘मेगा ब्लॉक’

Amit Kulkarni

वेळसांवच्या किनाऱयावर वास्कोतील युवतीचा खून, मित्राला अटक

Omkar B

साडेपाच लाखाची अवैद्य दारू जप्त

Patil_p
error: Content is protected !!