प्रतिनिधी /कुंकळळी
कुंकळळी युनायटेड हायस्कूलमध्ये पालक शिक्षक संघाच्या बैठकीचे आयोजन झाले. यावेळी व्यासपीठावर कुंकळळी एज्युकेशन संस्थेचे चेअरमन वीरेंद्र देसाई, तसेच सचिव प्रकाश देसाई, व्यवस्थापक विवेक पडियार, मुख्याध्यापिका शंकुतला राऊत देसाई व पालक शिक्षक संघाच्या अध्यक्षा शिल्पा रायकर यांची उपस्थिती होती.
यावेळी उपस्थितांचे स्वागत मुख्याध्यापिका शंकुतला राऊत देसाई यांनी केले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते दहावीतील गुणवंत विद्यार्थ्यांना गौरविण्यात आले. यावेळी शाळेच्या कौन्सिलर निफा आल्फांसो यांनी मुलांच्या रोजच्या समस्या आणि मोबाईलचे दुष्परिणाम यावर भाष्य केले.
कुंकळळी एज्युकेशन संस्थेचे अध्यक्ष वीरेंद्र देसाईनेही यावेळी पालकांना मार्गदर्शन केले. या पालक शिक्षक संघाच्या बैठकीला सुमारे अडीचशेहून पालक सहभागी झाले होते. आभार प्रदर्शन प्राजक्ता सावंतने तर सूत्रसंचालन प्रज्ञा पाध्येने केले. या बैठकीची सांगता शेवटी राष्ट्रगीताने झाली.