Tarun Bharat

जीएसएस कॉलेजमध्ये पालक मेळावा

Advertisements

प्रतिनिधी /बेळगाव

जीएसएस कॉलेजमध्ये बुधवारी विद्यार्थी-पालक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला एसकेई सोसायटीचे उपाध्यक्ष प्रा. एस. वाय. प्रभू उपस्थित होते. अध्यक्ष किरण ठाकुर यांनी मांडलेल्या संकल्पनेनुसार भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त स्वातंत्र्यपूर्व व स्वातंत्र्योत्तर भारत याबद्दलचे विविध कल्पनाविष्कार व त्यांची सुरेख मांडणी करण्यात आली होती. यानिमित्त बोलाविण्यात आलेल्या विद्यार्थी-पालक सभेस बहुसंख्य पालकांनी हजेरी लावून पाल्यांच्या उपक्रमांचे कौतुक केले.

प्राचार्य बी. एल. मजुकर यांनी स्वागत केले. प्रा. एस. वाय. प्रभू यांनी, विद्यार्थ्यांना कार्य स्वतंत्र करण्याची मुभा, त्यांच्या सृजनशीलतेला वाव, त्याचबरोबर योग्य मार्गदर्शन मिळाल्यास विद्यार्थी उत्तम कार्य करू शकतात, हे विद्यार्थ्यांनी या कल्पना अविष्कारातून दाखवून दिल्याचे त्यांनी सांगितले. प्रा. भरत तोपिनकट्टी यांनी महाविद्यालयामध्ये नव्याने सुरू करण्यात आलेल्या पदव्युत्तर उपक्रमांची माहिती दिली. महाविद्यालयामध्ये ऑरगॅनिक केमिस्ट्री, बॉटनी, झुऑलॉजी आणि फिजिक्स या पदव्युत्तर उपक्रमांबरोबर नव्याने सुरू करण्यात येणाऱया बायोकेमिस्ट्री, मायक्रो बायोलॉजी व एनक्हार्यन्मेंटल सायन्स या पदव्युत्तर कार्यक्रमांची त्यांनी
माहिती दिली.

राणी चन्नम्मा विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रात जीएसएस महाविद्यालय हे एकमेव असे पदव्युत्तर केंद्र आहे, जिथे 7 पदव्युत्तर अभ्यासक्रम राबविण्यात येणार आहेत. विद्यार्थी वर्गाने याचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले. यावेळी प्राध्यापक पी. एस. पाटील, प्रा. अरविंद हलगेकर, डॉ. संदीप देसाई यांच्यासह प्राध्यापक, पालक, विद्यार्थी, उपस्थित होते. पालक-शिक्षक संघटनेच्या चेअरपर्सन प्रा. अंबुजा चिटणीस यांनी सूत्रसंचालन केले.

error: Content is protected !!