Tarun Bharat

बंगालींविषय वक्तव्यावर परेश रावलांचा माफीनामा

गॅस सिलिंडरचे काय करणार, बंगालींसाठी मासे भाजणार का?

परेश रावल यांना वलसाड येथे बंगालींसंबधी केलेल्या वादग्रस्त विधानावर माफी मागावी लागली आहे. बंगालींचा माझा अर्थ अवैध बांगलादेशी आणि रोहिंग्यांशी होता. माझ्या वक्तव्यामुळे कुणाला ठेच पोहोचली असल्यास मी माफी मागतो असे रावल यांनी म्हटले आहे.

माजी खासदार आणि अभिनेते परेश रावल हे गुजरात विधानसभा निवडणुकीत भाजपचे स्टार प्रचारक आहेत. गुजरातचे लोक महागाई सहन करतील, परंतु बांगलादेशी आणि रोहिंग्यांना स्वीकारणार नाहीत असे रावल यांनी वलसाड येथील सभेत म्हटले होते.

गॅस सिलिंडर महाग आहेत, कधी न कधी त्यांच्या किमती कमी होतील. लोकांना रोजगारही मिळेल. परंतु दिल्लीप्रमाणे जर रोहिंग्या आणि बांगलादेशी तुमच्या परिसरात राहू लागले तर काय होईल?  गॅस सिलिंडरचे तुम्ही काय करणार? बंगालींसाठी मासे भाजणार का? गुजरातचे लोक महागाई सहन करतील परंतु बांगलादेशी अन् रोहिंग्यांना सहन करणार नाहीत असे परेश रावल यांनी म्हटले होते.

या वक्तव्यामुळे रावल यांना टीकेला सामोरे जावे लागले. याचमुळे रावल यांनी माफी मागितली आहे. बंगाली शब्दाबद्दल माझा अर्थ अवैध बांगलादेशी आणि रोहिंग्यांशी संबंधित होता. परंतु तरीही मी जर कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी माफी मागतो असे रावल यांनी नमूद पेले आहे. अरविंद केजरीवाल हे चार्टर्ड विमानाने गुजरातमध्ये येतात, मग रिक्षात बसून छायाचित्रे काढून घेतात. आम्ही अभिनयात पूर्ण आयुष्य घालविले, परंतु असा ड्रामेबाज कधीच पाहिला नव्हता. केजरीवालांनी हिंदूंना अनेक शिव्या दिल्या, शाहीनबागमध्ये बिर्याणी पुरविली होती. गुजरातचे लोक महागाई सहन करतील, परंतु हा प्रकार सहन करणार नाहीत असे रावल यांनी सभेत म्हटले होते.

Related Stories

यावर्षीचा अर्थसंकल्प आर्थिक विकासाला प्रोत्साहन देणारा : गृहमंत्री

Archana Banage

सीआरपीएफच्या सुरक्षा यंत्रणेत सुधारणा

Patil_p

दात येत नसल्याने खाताना त्रास होतोय

Patil_p

कोरोना लस, ऑक्सिजनसह इतर उपकरणांवरील सीमाशुल्क माफ

datta jadhav

दिल्लीत 256 नवे कोरोनाबाधित

Tousif Mujawar

मुस्लीम लीगचा बालेकिल्ला, कम्युनिस्ट हार्ट लँड

Amit Kulkarni