Tarun Bharat

किल्ले अजिंक्यताऱयाला गोडोलीकरांची परिक्रमा

विशाल कदम/ सातारा

अलिकडच्या काळात पायी चालणे तसे दुरापस्त बनले आहे. साताऱयातील अनेक नागरिक हे न चुकता किल्ले अजिंक्यताऱयावर सकाळी जातात. त्यापैकीच एक चंद्रकांत उत्तेकर यांनी आठ दिवसांपूर्वी ठरवले की अजिंक्यताऱयाची परिक्रमा करायची. त्यांच्या इतर पाच मित्रासमवेत त्यांनी रविवारी पहाटे पाच वाजल्यापासून  गोडोली येथील साईबाबा मंदिरापासून अजिंक्यताऱयाच्या परिक्रमेला सुरवात केली. बघता बघता साडे तीन तासात पुन्हा साई बाबा मंदिराजवळ 8.25 वाजता पोहचले आणि त्यांचे उद्दीष्ठ सफल झाले. 

पायी चालण्याला, धावण्याला अलिकडच्या काळात मोठे महत्व आले आहे. साताऱयाच्या हिल मॅरेथॉनला तर मोठी पसंती धावण्यामुळे मिळू लागली आहे. त्यातच सकाळी मॉर्निंग वॉक करणाऱयांची संख्या वाढताना दिसते. किल्ले अजिंक्यताऱयावर सकाळी फिरायला जाणारे अनेक आहेत. यवतेश्वर घाटामध्ये चालत जाणारे अनेक आहेत. कुरणेश्वर बोगद्याकडे चालत जाणारे अनेक आहेत. मात्र, किल्ले अजिंक्यताऱयाला पूर्ण परिक्रमा चालत करणारे क्वचितच आढळून येतील. साताऱयातील चंद्रकांत उत्तेकर यांनी 2019 ला गिरनार पर्वताची परिक्रमा केली होती. त्याही अगोदरपासून ते किल्ले अजिंक्यताऱयावर दररोज सकाळी चालत जातात. गेल्या आठ दिवसांपासून त्यांनी आपले मित्र विवेक म्हस्के, उत्तम रांगट, मारुती जावलीकर, सुनील कोळी, संजय कदम यांना अजिंक्यताऱयाची परिक्रमा चालत करायची आहे. तुम्ही तयार आहात का?, अशी विचारणा केली आणि दिवस ठरवला. रविवारी पहाटे पाच वाजता ते साईबाबा मंदिराच्या चौकात जमले. त्यांनी परिक्रमणा पूर्ण करण्यासाठी गुळाची चिक्की, काही फळे, पाणी असे साहित्य घेतले होते. साई बाबांचे दर्शन घेऊन पहाटे पाच वाजता चालायला सुरुवात केली. बघता बघता शिवराज पेट्रोल पंप, खिंडवाडी, खिंडवाडी ते बोगदा जाणारा रस्त्याने बोगद्यातून समर्थ मंदिर, समर्थ मंदिरापासून राजपथ मार्गे साई बाबा मंदिर असा चालत प्रवास करत सकाळी 8.25 ला पोहचले. त्यांनी परिक्रमा पूर्ण केल्याबद्दल   त्यांचे गोडोली परिसरातून कौतुक होत आहे.

गडावर आणि गडाच्या वाटेवर वृक्षारोपण

अजिंक्यतारा परिभ्रमण मंडळांकडून गडावर झाडे लावली आहेत. गणपती मंदिराच्या लगत वडाचे झाड 2014 ला लावले आहे. दरवर्षी 12 ऑगस्टला या झाडाचा वाढदिवस या मंडळाकडून साजरा केला जातो. गडावर सतत पायी जाणारे म्हणून अजिंक्यतारा परिभ्रमण मंडळ असे नामकरण 12 ऑगस्ट 2014 लाच झाल्याचे उत्तेकर यांनी सांगितले.

Related Stories

भाजपकडून महाराष्ट्राचा छळ, त्यांचा डाव यशस्वी होणार नाही; संजय राऊतांच्या दावा

Archana Banage

२०२४ नंतरही उद्धव ठाकरेच मुख्यमंत्री असतील : संजय राऊत

Archana Banage

सज्जनगडचा भिक्षावळ दौरा रद्द

datta jadhav

महाराष्ट्र : 4,122 रुग्णांना डिस्चार्ज; रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 94.03 %

Tousif Mujawar

गांधीधाम-पुरी एक्सप्रेसच्या दोन डब्यांना आग

datta jadhav

…हा तर लोकशाहीवरचा सामूहिक बलात्कार : संजय राऊत

Tousif Mujawar