Tarun Bharat

हार्डी संधूसोबत दिसणार परिणीति

Advertisements

नाव न ठरलेल्या चित्रपटाचे पहिले पोस्टर सादर

अभिनेत्री परिणीति चोप्रा हिच्यासाठी 2022 आणि 2023 ही दोन वर्ष अत्यंत महत्त्वाची ठरणार आहेत. या कालावधीत ती अनेक बिगबजेट चित्रपटांमध्ये दिसून येणार आहे. अमिताभ बच्चन यांच्यासोबत ती ‘उंचाई’ चित्रपटात झळकणार आहे. तर आता ती पहिल्यांदाच पंजाबी गायक हार्डी संधूसोबत मोठय़ा पडद्यावर दिसून येणार आहे. मागील काही काळापासून परिणीति आणि हार्डी संधू स्वतःच्या नाव न निश्चित झालेल्या चित्रपटाचे चित्रिकरण करत आहेत. या चित्रपटाचे पोस्टर सादर करण्यात आले आहे.एका पोस्टरमध्ये परिणीतिचा रफ अँड टफ लुक दिसून येत आहे. तर दुसऱया पोस्टरमध्ये हार्डी संधू असून त्याच्या डोक्यातून रक्त वाहत असल्याचे दिसून  येत आहे.

परिणीति चोप्रा सोशल मीडियावर अत्यंत सक्रीय असून ती स्वतःच्या चित्रपटांशी निगडित माहिती इन्स्टाग्रामवर स्वतःच्या चाहत्यांना देत असते. या पोस्टरपूर्वी परिणीतिने इन्स्टाग्रामवर हार्डी संधूसोबतच्या चित्रिकरण स्थळाची अनेक छायाचित्रे तसेच बिहाइंड द सीन्स व्हिडिओ शेअर केले होते. परिणीति आणि हार्डी संधू पहिल्यांदाच मोठय़ा पडद्यावर एकत्र दिसून येणार असल्याचे दोघांचे चाहते अत्यंत उत्सुक आहेत.

Related Stories

जयललितांच्या व्यक्तिरेखेत कंगना

Patil_p

प्रेमाची नवी परिभाषा ‘द लव्हबर्ड्स’

Omkar B

टीव्हीवरील ‘या’ अभिनेत्रीला झाली दुखापत;डॉक्टरांनी दिला विश्रांतीचा सल्ला…

Kalyani Amanagi

प्लॅनेट टॅलेंटच्या यादीत गायत्री दातार

Patil_p

व्हायरस मराठीचा लॉकडाऊन फिल्म फेस्टिव्हल

Patil_p

चित्रपट निवडताना आईचा घेते सल्ला

Patil_p
error: Content is protected !!