Tarun Bharat

पार्थ चटर्जींची कन्या, जावईही लक्ष्य

Advertisements

कोलकाता / वृत्तसंस्था

पश्चिम बंगालमधील कोटय़वधी रुपयांच्या शाळा सेवा आयोग घोटाळय़ाचे सूत्रधार आणि मुख्य आरोपी तसेच राज्याचे माजी मंत्री आणि तृणमूल काँगेस नेते पार्थ चटर्जी यांची कन्या आणि जावई यांचीही चौकशी ईडीकडून केली जाणार आहे. त्यांची नावे सोहिनी भट्टाचार्य आणि कल्याणमोय भट्टाचार्य अशी आहेत.

ईडीने त्यांना समन्स पाठवून चौकशीसाठी उपस्थित राहण्याची सूचना केली आहे. तथापि, त्यांना या घोटाळय़ाच्या संबंधात समन्स पाठविण्यात आले नसून अन्य प्रकरणात पाठविण्यात आले आहे, असे स्पष्टीकरण ईडीने केले आहे. मात्र, या घोटाळय़ाशी त्यांचा संबंध आहे काय याची चाचपणीही ईडीकडून चौकशीत केली जाऊ शकते अशी सूत्रांची माहिती आहे. कल्याणमोय भट्टाचार्य यांचा संबंध इम्प्रोलाईन कन्स्ट्रक्शन्स, एचआरआय वेल्थ क्रिएशन रिऍल्टर्स आणि ऍक्रिसियस कन्स्लटिंग या तीन कंपन्यांशी असून ते या कंपन्यांचे व्यवस्थापकीय संचालक आहेत. तर अन्य दोन कंपन्यांमध्ये ते संचालक आहेत. या कंपन्यांचे व्यवहार ईडीच्या दृष्टीला पडले असून त्यांची चौकशी केली जाणार आहे.

भट्टाचार्य हे अमेरिकेत वास्तव्यास असतात. तेथून ते या कंपन्यांचा व्यवहार कसा पाहतात, हे ईडीला जाणून घ्यायचे आहे. तसेच त्यांचे एक फार्महाऊस असून त्यासंबंधीही चौकशी केली जाणार आहे. हे फार्महाऊस सोहिनी यांच्या नावावर आहे. या फार्महाऊसला पार्थ चटर्जी आणि त्यांची सहकारी अर्पिता मुखर्जी यांनी अनेकदा भेट दिली होती, असा पुरावा ईडीकडे आहे. या फार्महाऊसमध्ये 27 जुलैला चोरी झाली होती. तेव्हापासून ते ईडीच्या दृष्टीपथात आहे.

कोठडीत वाढ

पार्थ चटर्जी आणि अर्पिता मुखर्जी यांच्या ईडी कोठडीत वाढ करण्यात आली आहे. त्यांना आता 14 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत जाण्याचा आदेश देण्यात आला आहे. शुक्रवारी त्यांना येथे न्यायालयात उपस्थित ठेवण्यात आले. त्यांच्यावरील आरोप गंभीर असल्याने त्यांची सविस्तर चौकशी करणे आवश्यक आहे. त्यामुळे त्याच्या कोठडीत वाढ करावी, अशी मागणी ईडीकडून करण्यात आली होती. मात्र, वादग्रस्त व्यवहारांची सर्व कागदपत्रे ईडीच्या हाती असल्याने ईडी कोठडीची आवश्यकता नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले.

Related Stories

शेतकऱयांच्या हक्कासाठी लढत राहणार !

Patil_p

तीन राजधान्यांची योजना आंध्रकडून मागे

Patil_p

मुलांच्या मृत्यूप्रकरणी डॉक्टर कफील खान बडतर्फ

Amit Kulkarni

लष्करातील खर्चात 20 टक्के कपात

Patil_p

सलग दुसऱ्या दिवशी अडीच लाखांहून अधिक रुग्णांची नोंद

datta jadhav

काँग्रेसशिवाय भाजपविरोधी आघाडी ?

Patil_p
error: Content is protected !!