Tarun Bharat

युथ हॉस्टेल असोसिएशन ऑफ इंडिया यांच्यातर्फे ठाणे येथील पदभ्रमण मोहिमेमध्ये सहभागी

वाळपई / प्रतिनिधी.

गोवेकरांची जीवनशैली झपाटय़ाने बदलू लागलेली आहे. तरीसुद्धा गोवेकरांनी आपली संस्कृती व स्वभाव टिकून ठेवलेला आहे. गोवेकरी निसर्गावर अपार प्रेम करतात त्याचप्रमाणे इतरावरही जिवापाड प्रेम करीत असतात. त्यामुळे निसर्गाचे संवर्धन करण्याच्या दृष्टिकोनातून गोवेकारांनी आतापर्यंत चांगल्या प्रकारचे योगदान दिलेले आहे. युथ हॉस्टेल असोसिएशन ऑफ इंडिया यांच्यातर्फे सत्तरी तालुक्मयात गेल्या दहा वर्षापासून सातत्याने पदभ्रमण मोहीम आयोजित करून सत्तरी तालुक्मयाची नैसर्गिक सौंदर्यता जागतिक स्तरावर नेण्यासाठी संस्थेने केलेले कार्य खरोखरच कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन हिमाचल प्रदेश राज्याचे राज्यपाल तथा या असोसिएशनचे चेअरमन राजेंद्र पार्लेकर यांनी केले आहे.

ठाणे या ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात त्यांनी बोलताना पुढे सांगितले की सुमारे 4 कोटी खर्चून हिमाचल प्रदेशमध्ये कायमस्वरूपी पदाभमण केंद्र विकसित करण्यात येणार आहेत .या संदर्भाची कागदपत्रे सोपस्कार सुरू झालेले आहेत. यामुळे येणाऱया काळात हिमाचल प्रदेशमध्ये मोठय़ा प्रमाणात पदभ्रमण मोहीम आयोजित करून सदर भागातील नैसर्गिक सौंदर्याला वाव देण्याचा प्रयत्न आपण करणार असल्याचे आश्वासन यावेळी त्यांनी दिले.

 ठाणे सत्तरी येथील पंचायतीच्या सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमास ऑल इंडिया युथ हॉस्टेलच्या गोवा शाखेचे अध्यक्ष तथा माजी आमदार सिद्धार्थ कुंकळकर सचिव मनोज जोशी पंचायतीचे प्रशासक अझीझ शहा सचिव विनायक गावकर सचिव सर्वेश गावकर पंचायतीचे माजी उपसरपंच गोविंद कोरगावकर व इतरांची यावेळी उपस्थिती होती.

  यावेळी बोलताना राजेंद्र आर्लेकर  यानी सांगितले की आज निसर्ग वाचविण्याचे मोठे आव्हान प्रत्येकासमोर निर्माण झालेले आहे. यामुळे प्रत्येकाने आपल्यापरीने यासाठी योगदान देणे अत्यंत गरजेचे आहे. निसर्गाचे संवर्धन करायचे असेल तर प्रत्येकाने आपला खारीचा वाटा उचलणे अत्यंत गरजेचे आहे .यामुळेच आपण  गोवा विधानसभेचे सभापती असताना पेपरलेस विधानसभेचे कामकाज यावर भर दिला होता. यामुळे 1328 झाडांचे ं संवर्धन झालेले आहे असे यावेळी त्यांनी सांगितले.

 पावसाळी मौसमच्या माध्यमातून सतरी तालुक्मयातील निसर्गाला विशिष्ट असे वैभव प्राप्त झालेले आहे. यामुळे या निसर्गाचा जागतिक स्तरावर प्रसार व्हावा यासाठी अशा प्रकारची पदभ्रमण मोहीम आयोजित केल्याबद्दल त्यांनी संस्थेच्यावतीने आयोजकांचे अभिनंदन केले व येणाऱया काळात अशा प्रकारची शिबिरे आयोजित करण्यावर भर द्यावी अशा प्रकारचे आवाहन केले.

यावेळी बोलताना गोवा राज्याचे अध्यक्ष सिद्धार्थ कुंकळकर यांनी सांगितले की गेल्या दहा वर्षापासून अशा प्रकारची शिबिरे सातत्याने आयोजित करण्यात येत असतात. यंदा याला चांगल्या प्रकारचा प्रतिसाद लाभला असून जवळपास 600 नागरिक भारताच्या वेगवेगळय़ा भागातून सहभागी झालेले आहेत‌. येणाऱया काळात अशाच प्रकारचे हिवाळी पदभ्रमण मोहीम आयोजित करून भगवान महावीर अभयारण्यामध्ये जंगली प्राण्यांचा अनुभव घेण्याची विशिष्ट संधी लाभणार आहे यामध्ये मोठय़ा संख्येने सर्वांनी सहभागी व्हावे असे आवाहन सिद्धार्थ कुंकळकर यांनी यावेळी केले.

या असोसिएशनचे सचिव मनोज जोशी यांनी यावेळी बोलताना सदर पदभ्रमण मोहीम आयोजित करण्यासाठी पंचायत, स्थानिक नागरिक, स्थानिक पंच सभासद स्थानिक आमदार दिव्या राणे, आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी चांगल्या प्रकारे सहकार्य केलेले आहे. यामुळे सत्तरी तालुक्मयात अशा प्रकारे पदभ्रमण मोहीम आयोजित करण्याची चांगली संधी लाभलेली आहे.

प्रत्येक आठवडय़ाला वेगवेगळी तुकडी या मोहिमेमध्ये सहभागी होत असते. या एका आठवडय़ाच्या पदभ्रमण मोहिमेमध्ये सत्तरी तालुक्मयातील वेगवेगळय़ा ठिकाणी असलेले दहा धबधबे अनुभवण्याची चांगली संधी उपलब्ध होत असते .आतापर्यंत ही पदभ्रमण मोहीम चांगल्या प्रकारे यशस्वी झाल्याचे मनोज जोशी यांनी यावेळी स्पष्ट केले.

प्रारंभी व्यासपीठावरील उपस्थित मान्यवरांचे पुष्पगुच्छ प्रदान करून स्वागत करण्यात आले. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रवीण सबनीस यांनी केले व शेवटी त्यांनीच आभार मानले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

यावेळी सहभागी झालेल्या नागरिकांनी शिबिरा संदर्भाचे आपले चांगले अनुभव कथन केले व ज्या अडचणी आहेत त्या सोडवण्याच्या दृष्टिकोनातून आयोजकांनी प्रयत्न करावेत अशा प्रकारची विनंती केली.

Related Stories

मनपाच्या अटीमुळे लोकोत्सव आयोजकांपुढे पेचप्रसंग

Patil_p

मोलेत परप्रांतीय वाहनांच्या गर्दीवरुन ग्रामस्थ संतप्त

Omkar B

केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांनी आताच राजीनामा द्यावा

Amit Kulkarni

राजभवनच्या निधीचा वापर हा फक्त जनतेच्या सेवेसाठी

Amit Kulkarni

केपे तालुक्यातील 11 पंचायतींत 82.79 टक्के मतदान

Amit Kulkarni

गोमंतकीयांच्या हितासाठी आरजीचे सरकार स्थापन करा

Amit Kulkarni