स्थानिक स्वच्छता कंत्राटदारांनी फिरविली पाठ
प्रतिनिधी /बेळगाव
शहराच्या स्वच्छतेचे काम कंत्राट पद्धतीने केले जाते. यापूर्वी 20 पॅकेज करून निविदा काढण्यात आल्या होत्या. मात्र आता यामध्ये कपात करून केवळ पाच पॅकेजद्वारे 22 कोटींच्या स्वच्छता कामाच्या निविदा काढण्यात आल्या आहेत. दुसऱयांदा काढण्यात आलेल्या निविदा प्रक्रियेत पुणे येथील बीव्हीजी कंपनीने सहभाग घेतला आहे.
स्थानिक कंत्राटदारांकरवी शहरातील कचऱयाची उचल आणि गटारींची स्वच्छता केली जात होती. यापूर्वी 20 पॅकेजद्वारा निविदा काढून स्वच्छतेचे काम देण्यात आले होते. मात्र निविदाची मुदत संपुष्टात आल्याने नव्याने निविदा प्रक्रिया राबविण्यात आली होती. मात्र निविदा प्रक्रियेतील अटी आणि नियमावलीमुळे कंत्राटदारांनी सहभाग घेतला नव्हता. त्यामुळे मागील तीन वर्षांपासून जुन्याच कंत्राटदारांकरवी स्वच्छतेचे काम करण्यात येत होते. मात्र अलीकडेच नव्याने निविदा काढण्यात आल्या होत्या. पण यावेळी 20 पॅकेजद्वारा निविदा काढण्याऐवजी पाच पॅकेज करून निविदा प्रक्रिया राबविण्यात आली होती. पण निविदा प्रक्रियेतील अटींमुळे कंत्राटदारांनी सहभाग घेतला नाही. त्यामुळे महापालिकेने दुसऱयांदा निविदा प्रक्रिया राबविली होती. यावेळीदेखील केवळ एकाच कंत्राटदाराने सहभाग घेतला आहे. पण या प्रक्रियेकडे स्थानिक स्वच्छता कंत्राटदारांनी पाठ फिरविली आहे.
पाच पॅकेजपैकी चार पॅकेजकरिता पुणे येथील बीव्हीजी कंपनीने निविदा दाखल केल्या आहेत. सदर कंपनीकडे 75 हजारांहून अधिक कामगार कार्यरत आहेत. पुणे, मुंबईसह बेंगळूर आणि देशातील विविध शहराच्या स्वच्छतेच्या कामाची जबाबदारी या कंपनीकडे आहे. मात्र या कंपनीने केवळ चार पॅकेजकरिता निविदा दाखल केल्या आहेत. निविदाची टेक्निकल इव्हॅल्यूशन करण्यात येत आहे. त्यानंतर फायनान्शियल बीट ओपन करण्यात येणार आहे. त्यानंतर कंत्राटदार नियुक्ती केली जाणार आहे. यापूर्वी स्वच्छतेचे काम स्थानिक कंत्राटदारांनीच केले आहे. निविदा प्रक्रियेत सदर कंपनी पात्र झाल्यास पहिल्यांदाच शहराच्या स्वच्छतेचे काम शहराबाहेरील कंत्राटदाराकडे जाण्याची शक्मयता आहे.