प्रतिनिधी /बेळगाव
पॅपिटल वन ही संस्था गेली अकरा वर्षे बेळगाव शहरांमध्ये नाट्या चळवळ घडवून आणत आहे. बेळगाव शहर व परिसरातील कलाकार, दिग्दर्शक निर्माते व रसिकाना पॅपिटल वन एकांकिका स्पर्धेच्या अनुषंगाने नाट्यापर्वणी उपलब्ध झाली आहे.
यंदाच्या स्पर्धेमध्येही संस्थेने पहिल्यांदाच स्पर्धेसाठी प्राथमिक फेरी आयोजिली होती. प्राथमिक फेरीसाठी एकूण 28 संघांनी आपला सहभाग नोंदविला. त्यामधून 14 संघांची निवड केली असून, निवड ही संहिता व आभासी तत्त्वावर व तज्ञाबरोबर सखोल चर्चा करून केली आहे.
निवड झालेल्या संघांची आंतरराज्य गट नाट्याकला मराठी विभाग आरपीडी महाविद्यालय, बेळगाव, विवेकानंद कॉलेज, कोल्हापूर, साई कला मंच, इचलकरंजी, लोकरंगभूमी, सांगली, नाट्याशुभांगी, जयसिंगपूर, राजारामबापू इन्स्टिटयूट ऑफ टेक्नॉलॉजी इस्लामपूर, महाशाला कला संगम, गोवा, परिवर्तन कला फाउंडेशन, कोल्हापूर, गायन समाज देवल क्लब, कोल्हापूर, बाराखडी नाट्या मंडली, सातारा, रंगयात्रा नाट्या संस्था, इचलकरंजी, कलासक्त, मुंबई, झिरो बजेट प्रोडक्शन, सिंधुदुर्ग, जिल्हा मर्यादित शालेय गट, राहुल मोहनदास प्रोडक्शन, बेळगाव, कॉमन टच प्रोडक्शन, महिला विद्यालय हायस्कूल, विद्यानिकेतन हायस्कूल.
स्पर्धा दि. 9 व 10 जानेवारी 2023 रोजी लोकमान्य रंगमंदिर कोनवाळ गल्ली येथे पार पडणार आहेत.
स्पर्धा सर्वांसाठी खुल्या असून, काही जागा राखून ठेवल्या आहेत. एकांकिकाच्या सादरीकरणाची वेळ एक तासाची आहे. नाट्या रसिकांनी आपल्या सोयीनुसार स्पर्धा पाहण्यास यावे. पण, प्रयोग सुरू असताना व्यत्यय आणू नये. एकांकिका सुरू असताना कोणालाही मध्येच नाट्यागृहात प्रवेश दिला जाणार नाही. याची सर्वांनी नोंद घ्यावी असे संस्थेने कळविले आहे.