Tarun Bharat

आरपीडी-जीएसएसच्या विद्यार्थ्यांचा दिल्ली येथील कॅम्पमध्ये सहभाग

Advertisements

प्रतिनिधी /बेळगाव

एसकेई सोसायटीच्या आरपीडी-जीएसएसचे एनसीसी कॅडेट रोहन अनगोळकर व मिलन धामणेकर यांनी दिल्लीत झालेल्या नॅशनल थलसैनिक कॅम्पमध्ये सहभाग घेतला होता. 13 ते 22 सप्टेंबरदरम्यान दिल्ली येथे हा कॅम्प झाला होता. विजापूर येथे झालेल्या गोवा व कर्नाटक एनसीसी विभागाच्या टीएससी कॅम्पमध्येही या दोघांची निवड झाली होती. त्यांनी 26 कर्नाटक बटालियन एनसीसीचे कर्नाटक प्रतिनिधी म्हणून प्रतिनिधीत्व केले.

एनसीसी बटालियन कमांडिंग ऑफिसर कर्नल एस. दर्शन, कर्नल संजीव सहाने,  ऍडम ऑफिसर कर्नल एस. व्ही. यादव, ले. कर्नल नंदकुमार, एसकेई सोसायटीचे चेअरमन किरण ठाकुर, क्हा. चेअरमन एस. वाय. प्रभु, प्राचार्या डॉ. अनुजा नाईक,  प्राचार्य बी. एल. मजुकर, एनसीसी ऑफिसर कॅप्टन डॉ. एम. एस. कुरणी, ले. प्रियांका कुंडेकर यासह 26 कर्नाटक बटालियन एनसीसीकडून त्यांचे कौतुक होत आहे.

Related Stories

शुक्रवारी 114 रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह

Patil_p

जीएसएस कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण

Omkar B

अहवालात १४४ पण कोणालाच नाही त्रास; ग्रामस्थात संताप

Archana Banage

बी-बियाणे,खतांचे दर तातडीने कमी करा!

Tousif Mujawar

वॉर्डनिहाय मतदारयादी तयार करण्यासाठी हालचाली सुरू

Amit Kulkarni

आंत्रविषार प्रतिबंधक लसीकरण मोहीम अंतिम टप्प्यात

Amit Kulkarni
error: Content is protected !!