Tarun Bharat

जम्मू-काश्मीरमध्ये प्रवाशी बस उलटली, 25 जखमी

Advertisements

ऑनलाईन टीम / तरुण भारत :

जम्मू-काश्मीरमध्ये आज सकाळी प्रवाशांनी भरलेली बस उलटली. या अपघातात 25 प्रवाशी जखमी झाले असून, त्यांना उधमपूर येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर सहा जणांची प्रकृती गंभीर असून, त्यांना जम्मूतील सरकारी रुग्णालयात पाठवण्यात आलं आहे.

अपघातग्रस्त बस जम्मूहून डोडा जिल्ह्यात येत होती. दरम्यान, उधमपूरच्या बत्तल बालियान भागात आल्यावर ही बस उलटली. या भीषण अपघातात बसमधील 25 प्रवाशी जखमी झाले असून, 6 जणांची प्रकृती गंभीर आहे. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हा अपघात नेमका कशामुळे झाला हे अद्याप समजू शकलेलं नाही. बस चालकाला झोपेमुळे बस कंट्रोल करता आली नसावी, त्यामुळे हा अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला असून, पोलीस अधिक तपास करत आहेत.

Related Stories

संयुक्त राष्ट्राच्या गाडीत सेक्स, व्हिडिओ व्हायरल

datta jadhav

अविनाश भोसले यांना आज CBI न्यायालयात हजर करणार

datta jadhav

देशात 60,471 नव्या रुग्णांची नोंद

datta jadhav

“तुम्हाला आंदोलन करण्याचा अधिकार आहे, पण…”, सर्वोच्च न्यायालयाने आंदोलक शेतकऱ्यांना सुनावलं

Abhijeet Shinde

पुंछमध्ये चकमक, शोपियांमध्ये फळविक्रेत्याचा मृत्यू

Patil_p

ईईएसएलचे 1.6 कोटी स्मार्ट एलईडी दिवे लावण्याचे ध्येय

Patil_p
error: Content is protected !!