Passenger dies after falling from train
वास्को ते पटणा रेल्वेतून प्रवास करत असताना नागेंद्र पासवान ( ३५) या प्रवाशाचा रेल्वेतून खाली पडून मृत्यू झाला .सावंतवाडी रेल्वे स्टेशन पासून काही अंतरावर वेत्ये येथे ही घटना घडली . नागेंद्र पासवान व त्याची पत्नी गोवा येथे मजूरी कामासाठी असतात . दिवाळी निमित्त ते रेल्वेतून प्रवास करीत होते. घटनास्थळी पोलीस निरीक्षक फुलचंद मेंगडे व पथकाने घटनास्थळी भेट दिली .
सावंतवाडी / प्रतिनिधी