प्रतिनिधी/ बेळगाव
बेळगावहून उड्डाण होणाऱया बऱयाचशा विमानफेऱया तांत्रिक कारणाने रद्द केल्या जात असल्याने याचा नाहक मनस्ताप नागरिकांना सहन करावा लागत आहे. शुक्रवारी बेळगावहून तिरुपतीला जाणारे विमान स्टारएअरने अचानक रद्द केल्याने नागरिकांनी कंपनीच्या अधिकाऱयांना जाब विचारला. यामुळे काहीकाळ गेंधळाची स्थिती निर्माण झाली होती.
बेळगावहून तिरुपतीला सध्या एकच विमान कंपनी सेवा देत आहे. तिरुपती बालाजीच्या दर्शनासाठी जाणाऱयांची संख्या अधिक असल्यामुळे या विमानफेरीला चांगला प्रतिसाद आहे. आठवडय़ातून दोनदा सोमवार व शुक्रवार सेवा दिली जाते. तिरुपतीच्या दर्शनासाठी बुकिंग केलेले ग्राहक शुक्रवारी विमानतळावर दाखल झाले. यावेळी त्यांना विमान उशिराने येणार असल्याचे सांगण्यात आले. परंतु काही काळानंतर तांत्रिक कारणाने विमान रद्द करावे लागले, असे उत्तर देण्यात आले.
प्रवाशांनी स्टारएअरच्या कार्यालयाला भेट देऊन विमान अधिकाऱयांना जाब विचारला. तांत्रिक कारण देत अधिकाऱयांनी वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केला. परंतु नागरिक ऐकण्याच्या मनस्थितीत नसल्याने त्यांना इतर तारखेला प्रवास करण्याचा पर्याय देण्यात आला. यामुळे काहीकाळानंतर वाद निवळला.