Tarun Bharat

लिस्टिंगआधीच एलआयसीपुढे पेच

नवी दिल्ली

17 मे रोजी एलआयसीचा आयपीओ बाजारात लिस्ट होणार असून एक दिवस आधी एलआयसीचा समभाग ग्रे मार्केटमध्ये होता. तज्ञांच्या मते येणाऱया काळामध्ये समभागामध्ये तेजी दिसून येईल.

Advertisements

ग्रे मार्केटमध्ये एलआयसीच्या आयपीओचा प्रिमियम लिस्टिंगच्या आधीच घटलेला आहे. याचाच अर्थ सवलतीसह आयपीओ लिस्टिंग होण्याचे संकेत मिळत आहेत. एक दिवस आधी एलआयसी आयपीओ जीएमपी 0 ते 25 रुपये घटला होता.

ग्रे मार्केटवर लक्ष ठेवणाऱया बऱयाचशा विपेत्यांनी सांगितले, की विदेशी आणि संस्थात्मक गुंतवणूकदारांचा एलआयसी आयपीओला चांगला प्रतिसाद मिळाला नाही. त्याचा परिणाम एलआयसीच्या समभागांवर ग्रे मार्केटमध्ये दिसून आला. दुसरीकडे एलआयसी आयपीओला गुंतवणूकदारांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. परंतु, योग्य किंमत ठेवूनही विदेशी आणि संस्थात्मक गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यामध्ये एलआयसीला अपयश आले आहे. रिटेल आणि इतर गुंतवणूकदारांकडून सदरचा आयपीओ 2.95 पट सबस्क्राईब झाला आहे.

Related Stories

एअर इंडियाकडून वेतन कपात

Patil_p

बीएसएनएल-एमटीएनएल सेवा सरकारी कार्यालयात अनिवार्य

Omkar B

दुसऱया दिवशीही तेजीच कायम

Patil_p

‘मारुती’ची कार खरेदी होणार आणखीन सोपी

Patil_p

लॉकडाऊन दरम्यान ‘या’ बँकांचे होणार विलीनीकरण

tarunbharat

सेन्सेक्सची 629अंकांची उसळी

Patil_p
error: Content is protected !!