ऑनलाईन टीम/तरुण भारत
भीमा कोरेगाव प्रकरणी (bhima koregaon violence) राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (sharad pawar) यांनी आज साक्ष नोंदवली. या प्रकरणी शरद पवारांना तिसरं समन्स मिळालं होत. आज मुंबईत सुनावणी झाली. भीमा कोरेगाव येथे घडलेल्या हिंसाचाराची चौकशी करणाऱ्या जे.एन.पटेल आयोगासमोर शरद पवार यांनी साक्ष दिली आहे. यावेळी शरद पवारांनी दहा प्रश्नांची उत्तर दिली आहेत.
दरम्यान, भीमा कोरेगाव प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची आज जे एन पटेल आयोगाने साक्ष नोंदवली. या प्रकरणाचा तपास करणाऱ्या जे एन पटेल आयोगाने तिसऱ्यांदा शरद पवार यांना ५ आणि ६ मे रोजी मुंबईत होणाऱ्या सुनावणीला हजर राहण्यासाठी समन्स बजावण्यात आले. त्यांनी आयोगासमोर साक्ष दिली आहे. यावेळी त्यांना अनेक प्रश्न विचारण्यात आले. काही दिवसांपूर्वी पवारांनी या प्रकऱणी एक प्रतिज्ञापत्र सादर केलं होतं. २३ आणि २४ फेब्रुवारीला त्यांना साक्ष नोंदवण्यासाठी हजर राहता आलं नव्हतं. त्याची साक्ष पवारांनी आज आयोगासमोर नोंदवली.