क्रीडा प्रतिनिधी /बेळगाव
श्री कुच काडदेव पाटीदार संतान समाज बेळगाव आयोजित पाटीदार समाज मर्यादित महिलांच्या बॉक्स क्रिकेट स्पर्धेत सुपर फायटर्स संघाने पवन स्ट्रायकर्स संघाचा पराभव करून पाटीदार समाज चषक पटकाविला.
शिवगंगा रोलर स्केटींगच्या मैदानावर आयोजित श्री कुच काडदेव पाटीदार समाज आयोजित महिलांच्या क्रिकेट स्पर्धेत समाजाच्या 14 महिला संघांनी भाग घेतला होता.
बॉक्स क्रिकेट स्पर्धेतील अंतिम सामना पवन स्ट्रायकर्स व सुपर फायटर्स यांच्यात झाला. पवन स्ट्रायकर्सने 6 षटकात 4 बाद 30 धावा केल्या. त्याला उत्तर देताना सुपर फायटर्स संघाने 4.2 षटकात 3 बाद 31 धावा करून विजेतेपद मिळविले.
सामन्यानंतर प्रमुख पाहुणे नानाजी पटेल, प्रेमजी पटेल, मगनलाल पटेल, जितालाल पटेल, रतन सी. पटेल, भागवती पटेल, शांता पटेल यांच्या हस्ते विजेत्या सुपर फायटर्स व उपविजेत्या पवन स्ट्रायकर्स संघाला चषक, प्रमाणपत्र व रोख रक्कम देवून गौरविण्यात आले.