Tarun Bharat

युपीतील ‘शहरी स्थानिक’ निवडणुकांचा मार्ग मोकळा

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

उत्तर प्रदेशातील शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा मार्ग सोमवारी मोकळा झाला. इतर मागासवर्गीय (ओबीसी) आरक्षणाच्या मुद्याची तपासणी करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या आयोगाने अंतिम अहवाल सादर केल्याचे लक्षात घेऊन सर्वोच्च न्यायालयाने उत्तर प्रदेश सरकारला शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यासाठी अधिसूचना जारी करण्याची परवानगी दिली आहे. भारताचे सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड, न्यायमूर्ती पी. एस. नरसिंह आणि न्यायमूर्ती जे. बी. पारदीवाला यांच्या खंडपीठासमोर सुनावणी पार पडली. न्यायालयाच्या आदेशानंतर आता शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची अधिसूचना जारी करण्याची कसरत सुरू असून दोन दिवसांत ती जारी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Related Stories

जम्मू-काश्मीरमध्ये 82 रुग्णांची भर

Patil_p

उत्साही जीवनासाठी कौशल्य आवश्यक

Patil_p

देशातील शाळांच्या संख्येत घट

Amit Kulkarni

यूपी : कानपुरमध्ये बस आणि टेम्पोमध्ये भीषण अपघात, 17 जणांचा मृत्यू

Tousif Mujawar

ममतांना आणखी एक धक्का; निकटवर्तीय आमदाराचा राजीनामा

datta jadhav

भारतीय लसीला काँग्रेसने केले बदनाम

Patil_p
error: Content is protected !!