Tarun Bharat

स्वच्छतेसाठी 32 टक्के अधिक दर द्या

निविदेची रक्कम 7 कोटीने वाढणार : केवळ पाच टक्के अधिक दर देण्याची निविदा कायद्यात तरतूद

प्रतिनिधी /बेळगाव

शहरातील कचऱयाची उचल करण्यासह स्वच्छतेचे काम करण्यासाठी महापालिकेकडून कंत्राट दिले जाते. आता केवळ पाच पॅकेजद्वारे निविदा काढण्यात आल्या आहेत. बीव्हीजी कंपनीने यापैकी चार निविदांमध्ये सहभाग घेतला असून निविदा रकमेच्या 32 टक्के अधिक दराने निविदेची मागणी केली आहे. 32 टक्क्मयांप्रमाणे अधिक दर दिल्यास स्वच्छता निविदेच्या रकमेत 7 कोटी अधिक वाढ होणार आहे.

48 वॉर्डांच्या स्वच्छतेचे काम स्वच्छता कंत्राटदारांकरवी करण्यात येते. स्वच्छता कंत्राटाची मुदत संपल्याने नव्याने निविदा काढण्यात आल्या होत्या. मात्र निविदा प्रक्रियेत स्वच्छता कंत्राटदारांनी सहभाग घेतला नाही. त्यामुळे महापालिकेने दुसऱयांदा निविदा मागविल्या आहेत. यापूर्वी 20 पॅकेजच्या माध्यमातून निविदा काढण्यात येत होत्या. मात्र आता पाच पॅकेजद्वारे स्वच्छतेची निविदा प्रक्रिया राबविण्यात आली आहे. त्यामुळे प्रत्येक पॅकेजची रक्कम चार कोटींहून अधिक होते. इतक्मया रकमेच्या निविदा प्रक्रियेत सहभाग घेण्यासाठी वर्क डन सर्टिफिकेट जोडण्याची अट घालण्यात आली आहे. पण स्थानिक स्वच्छता कंत्राटदारांना इतक्मया रकमेचे वर्क डन सर्टिफिकेट जोडणे अशक्मय आहे. त्यामुळे या निविदा प्रक्रियेत एकाही स्वच्छता कंत्राटदाराने सहभाग घेतला नाही. तर दुसऱयांदा मागविलेल्या निविदा प्रक्रियेत पुण्याच्या बीव्हीजी कंपनीने सहभाग घेतला आहे.

नगरविकास खात्याची परवानगी आवश्यक

निविदेची छाननी सुरू असून या कंपनीने निविदा रकमेच्या 32 टक्के अधिक रक्कम देण्याची मागणी केली आहे. महापालिकेने स्वच्छतेच्या 21 कोटी 83 लाखांच्या पाच निविदा काढल्या आहेत. 21 कोटी 83 लाखांवर 32 टक्के अधिक दर दिल्यास निविदेची रक्कम 28 कोटी 81 लाख रुपये होते. स्वच्छता कामाच्या निविदेसाठी महापालिकेला 7 कोटी अधिक मोजावे लागू शकतात. पण 32 टक्के जादादर देण्याची तरतूद निविदा प्रक्रियेत नाही. केवळ पाच टक्के अधिक दर देता येवू शकतो. मात्र त्यासाठीही निविदेची चाचपणी करावी लागते. पाच टक्के वाढ दिल्यास स्वच्छता निविदेच्या रकमेत एक कोटींची वाढ होऊ शकते. पण याकरिता नगरविकास खात्याची परवानगी आवश्यक आहे. तसेच चार निविदांमध्ये कंपनीने सहभाग घेतला आहे. पण एकाच कंपनीने चार निविदांमध्ये सहभाग घेतल्यास उर्वरित कामाची निविदादेखील त्याच कंपनीला देण्याची तरतूद निविदा कायद्यात आहे.

Related Stories

बेळगावात बंद शांततेत; संमिश्र प्रतिसाद

Patil_p

आजपासून मुसळधार पाऊस

Omkar B

काकती येथील शिवप्रेमींकडून गडकोट मोहीम

Amit Kulkarni

उपमहापौर पदाची वाढली प्रतिष्ठा

Patil_p

किमान हमी भाव निश्चितीसाठी तज्ञ समिती नेमण्याकडे दुर्लक्ष

Patil_p

निपाणी तालुक्यात जिंकण्याच्या इर्षेतून होतोय ‘पैशाचा चुराडा’

Omkar B