Tarun Bharat

धनादेशाद्वारे वेतन,पीडीओंचे नैतिक पतन?

ग्राम पंचायत कर्मचाऱयांना अजूनही धनादेशाद्वारे मिळतेय वेतन, पीडीओ व अध्यक्षांच्या कारभारामुळे नाराजी, थेट खात्यावर रक्कम जमा करण्याची मागणी

प्रतिनिधी /बेळगाव

बेळगाव तालुक्मयात 57 ग्राम पंचायती आहेत. यामध्ये 40 हून अधिक पीडीओ व 200 हून अधिक कर्मचारी काम करतात. दरम्यान आता सर्व व्यवहार ऑनलाईन झाले आहेत. मात्र अजूनही काही ग्राम पंचायतींमध्ये धनादेशाद्वारे वेतन देण्याची प्रथा काही पीडीओ आणि अध्यक्षांनी लावून धरली आहे. या मागचे गौडबंगाल काय? असा सवाल उपस्थित होत आहे. दरम्यान मागील सहा-सहा महिन्यांपासून अजूनही अनेक कर्मचारी वेतनाच्या प्रतीक्षेत आहेत. त्यामुळे याबाबत तालुका पंचायतच्या वरि÷ अधिकाऱयांनी याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी होत आहे.

बेळगाव तालुक्यातील अनेक ग्राम पंचायतमध्ये कर्मचाऱयांना सढळ हस्ते किंवा धनादेशाद्वारे वेतन देण्याची प्रथा अजूनही कायम आहे. मात्र आता तसे न करता वेतन थेट खात्यावर जमा करण्याचे आदेश राज्य सरकारने दिले आहेत. मात्र या आदेशाला अजूनही वाटाण्याच्या अक्षता लावण्यात येत असल्याचे प्रकार उघडकीस आले आहेत. दरम्यान, अनेक अध्यक्ष व पीडीओ कर्मचाऱयांच्या पगारावरही डल्ला मारत असल्याच्या तक्रारी मध्यंतरी वाढल्या होत्या. जर थेट खात्यावर रक्कम जमा केली तर अध्यक्ष व पीडीओंचे कमिशन बाहेर निघणार कसे? यामुळेच धनादेश अथवा त्यांच्याकडून टक्केवारी ठरवूनच वेतन काढण्यात येत असल्याची बाब सामोरी आली आहे.

प्रामाणिकपणे काम करूनही हात पसरण्याची वेळ

बेळगाव तालुक्मयातील बहुतेक ग्राम पंचायत पीडीओ व अध्यक्षांनी असा फंडा चालविला आहे. वेळ ना काळ, रात्रंदिवस काम करूनही कर्मचाऱयांना वेतनासाठी मात्र अनेकवेळा मिनत्या व विनंत्यांचे अर्ज पीडीओंकडे करावे लागत आहेत. जर कर्मचाऱयांना सहा-सहा महिने वेतनासाठी प्रतीक्षा करावी लागत असेल तर घरातील कुटुंबांनी काय करायचे? असा प्रश्न उपस्थित होत आहे. प्रामाणिकपणे सेवा करूनही वेतनासाठी भिकाऱयांप्रमाणे पीडीओंकडे हात पसरण्याची वेळ आलेली दिसून येत आहे. कामाचा मोबदला देण्यासाठी कर्मचाऱयांना नाहक त्रास करण्यात अनेक जण धन्यता मानत आहेत. त्यामुळे याकडे आता गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी होत आहे.

एका ग्राम पंचायतमध्ये साधारण 5 ते 15 कर्मचारी वेगवेगळय़ा हुद्दय़ांवर काम करत असतात. क्लार्क, विद्युत दुरुस्ती करणारे, पाणीपुरवठा करणारे, ऑफीस बॉय यांच्यासह अनेक कर्मचारी काम करत असतात. मात्र त्यांच्या वेतनासाठी अनेकदा पीडीओंकडे विनंत्या कराव्या लागतात. दरम्यान कर्मचारी संघटनेने यासाठी जिल्हाधिकाऱयांना निवेदनेही दिली आहेत, आंदोलनेही केली आहेत. मात्र त्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करण्यात आल्याने संताप व्यक्त करण्यात येत आहे.

पगार करण्यास सहा महिन्यांचा विलंब

बेळगाव तालुक्मयातील अनेक ग्राम पंचायतमध्ये असे प्रकार सुरू आहेत. कर्मचाऱयांचे वेतन केवळ पाच मिनिटांत त्यांच्या खात्यावर जमा होऊ शकते. मात्र पीडीओ ते वेतन देण्यास टाळाटाळ करत असतात. बायोमेट्रीक यंत्राद्वारे कर्मचाऱयांचे वेतन करण्याची पद्धत आहे. त्यामुळे केवळ एक बोट ठेवल्यास संबंधित कर्मचाऱयांचा पगार थेट खात्यावर जमा होऊ शकतो. मात्र अनेक अधिकारी व अध्यक्ष तसे करताना दिसत नाहीत. त्यामुळे मोठी समस्या निर्माण होते. वेतन करण्यासाठी पीडीओंना पाच ते सहा महिन्यांचा कालावधी लागत आहे. त्यामुळे यामागील गौडबंगाल काय? असा सवाल उपस्थित होत आहे.

यापुढे पीडीओंनी पगार ऑनलाईन करावा

तालुक्मयातील एक नामवंत ग्राम पंचायतमध्ये असे प्रकार घडत असतील तर ते चुकीचे आहे. कारण यापूर्वीच सरकारने तसा ऑनलाईन पगार करण्याचा आदेश दिला आहे. त्यामुळे यापुढे दर महिन्याला पीडीओंनी कर्मचाऱयांचा पगार ऑनलाईन करणे गरजेचे आहे. तसे न केल्यास कारवाई करण्यात येईल.

-राजेश धनवाडकर, ता. पं. कार्यकारी अधिकारी

Related Stories

कॅन्टोन्मेंटमधील मालमत्तांचे ड्रोन कॅमेऱयाद्वारे सर्वेक्षण

Amit Kulkarni

कृष्णा नदीत बुडून भाविकाचा मृत्यू

Amit Kulkarni

मलेरिया कमी करा… जीव वाचवा…!

Amit Kulkarni

कोथिंबीरसह अन्य भाज्यांच्या दरात वाढ

Amit Kulkarni

कारोनाच्या धास्तीत नागपंचमी साजरी

Patil_p

युवा नेते जितेश खोत यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव

Omkar B