Tarun Bharat

पणजीतील पे पार्कीगमुळे मानवी हक्क भंग नाही

गोवा मानवी हक्क आयोग आयोगाने दिला निर्णय

प्रतिनिधी /मडगाव

पणजीत पे पार्कीग सोयीची अंमलबजावणी करताना कोणताही मानवी हक्काची पायमल्ली करण्यात आलेली नसल्याचे राज्य मानवी हक्क आयोगाने दिलेल्या आदेशात म्हटलेले आहे.

पणजीतील संजय सरमळकर यांनी गोवा मानवी हक्क आयोगाकडे वरील विषयासंबंधी 7 जुलै 2021 रोजी तक्रार केली होती. या तक्रारीत उत्तर गोव्याचे जिल्हाधिकारी तसेच पणजी महानगर पालिकेच्या आयुक्तांना प्रतिवादी करण्यात आले होते.

या तक्रारीच्या अनुषंगाने आयोगाने वरील दोन्ही प्रतिवाद्यांना नोटीस पाठवून त्याचे म्हणणे सादर करण्याचे निर्देश दिले. उत्तर गोव्याच्या जिल्हाधिकाऱयांनी 25 ऑगस्ट 2021 रोजी तर महानगर आयुक्तानी 29 ऑक्टोबर 2021 आपले म्हणणे आयोगाला सादर केले.

गोव्यात इतरत्र कोणत्याच शहरात पे पार्कीग फी आकारण्यात येत नाही. फक्त पणजी शहरातच फी आकारण्यात येते हा या तक्रारीचा आशय होता.

   दोन्ही पक्षांचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर या प्रकरणात तक्रारदाराच्या  मानवी हक्काची पायमल्ली करण्यात आलेली नसल्याचे राज्य मानवी हक्क आयोगाने मंगळवारी  दिलेल्या आदेशात म्हटलेले आहे.

Related Stories

लोकमान्य मल्टिपर्पज सोसायटी आगरवाडा शाखेतर्फे शिक्षक कृतज्ञता

Amit Kulkarni

आता पंचायत निवडणुकीचे पडघम

Amit Kulkarni

वारखंडे-फोंडा येथे आज वीरभद्र

Patil_p

बुधवारी कोरोनाचे 4 बळी

Omkar B

तरंगत्या जेटीसोबतच सोलर फेरीबोटीचे उद्घाटन

Amit Kulkarni

तीन मोठय़ा घोटाळय़ांचा होणार पर्दाफाश

Amit Kulkarni