Tarun Bharat

अंगणवाडी कर्मचाऱयांचे वेतन तातडीने द्या

‘सिटू’चे जिल्हाधिकाऱयांना निवेदन

बेळगाव : लहान मुलांना शिक्षण, पौष्टिक आहार यासह आरोग्य विभागातील सर्व कामे करणाऱया अंगणवाडी कर्मचारी महिलांचे वेतन गेल्या तीन महिन्यांपासून देण्यात आले नाही. त्यामुळे त्या महिला अडचणीत आल्या असून तातडीने त्यांना वेतन द्यावे, या मागणीसाठी सिटूच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करून निवेदन देण्यात आले.

अंगणवाडी कर्मचारी महिला सरकारी योजना सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवितात. लहान मुलांना पौष्टिक आहार याचबरोबर आरोग्य विभागामधील विविधप्रकारची कामे या कर्मचारी महिला करत असतात. मात्र त्यांना वेळेत वेतन दिले जात नाही. त्यामुळे अन्याय होत आहे. तेंव्हा तातडीने वेतन द्यावे, असे निवेदनात म्हटले आहे. महसूल अधिकारी एस. एम. परगी यांना निवेदन देण्यात आले. यावेळी मंदा नेवगी, सी. एम. कुलकर्णी, एस. एम. गावकर, सुनंदा पाटील, एस. ए. उचगावकर, एल. बी. पाटील, ए. एन. बोंगाळे, पी. एस. तलवारसह अंगणवाडी महिला उपस्थित होत्या.

Related Stories

निपाणीत शुद्ध पाणी पुरवठय़ात अडथळे

Patil_p

कला शाखेतून प्राची शाह बेळगाव शहरात प्रथम

Tousif Mujawar

दहावी परीक्षेसाठी शिक्षण खाते सज्ज

Omkar B

धामणे भागात पेरणीपूर्व मशागतीची कामे खोळंबली

Amit Kulkarni

राजू घाटेगस्ती यांची पंतप्रधान निधीस 50 हजारची मदत

Patil_p

चित्रगाथा स्वातंत्र्याची ‘385’ छायाचित्रांचे प्रदर्शन

Rohit Salunke
error: Content is protected !!