Tarun Bharat

खेलो इंडियाच्या‘सेंटर ऑफ एक्सलन्स’साठी पेडे स्टेडियम चांगला पर्याय

Advertisements

गोवा बॅडमिंटन संघटनेने दिले शासनाला लेखी निवेदन; बॅडमिंटनपटूंवर होणार अन्याय; पेडे स्टेडियमवर आवश्यक सर्व  सुविधा उपलब्ध

क्रीडा प्रतिनिधी /मडगाव

खेलो इंडिया सेंटर ऑफ एक्सलन्ससाठी कांपाल संकुलापेक्षा पेडे क्रीडा संकुल हा एक चांगला पर्याय असल्याचे मत गोवा बॅडमिंटन संघटनेचे सचिव संदीप हेबळे यांनी म्हटलं असून तशा आशयाचे निवेदन त्यांनी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, क्रीडामंत्री गोविंद गावडे, क्रीडा संचालक अजय गावडे आणि राज्याचे क्रीडा सचिव अजित रॉय यांना दिले आहे.

बॅडमिंटन संघटनेच्यावतीने आम्ही यापूर्वी कांपाल येथे नियोजित खेला इंडिया सेंटर ऑफ एक्सलन्ससाठी शासनाला विविध सूचना दिल्या आहेत. याबाबत अनंक बैठकाही झाल्या आणि या बैठकीत आम्ही पेडे क्रीडा संकुल हा एक चांगला पर्याय असल्याचे सांगितले होते. पेडे क्रीडा संकुलात धावण्याचे, चालण्याचे ट्रक आहेत. व्यायामशाळा, जलतरण तलाव असून हा एक विशाल आंतरराष्ट्रीय दर्जाचा स्टेडियम असून जो जास्त वापरात आलेला नाही. या ठिकाणी शारीरिक तंदुरूस्ती सत्रे, कार्यशाळा, चित्रपट स्क्रिनिंग, वर्कआऊट झोन तसेच साईचे वसतिगृह तसेच कार्यशाळा आयोजित करण्यासाठी मोठय़ा हॉलशिवाय पुरेशी जागाही असून जे सेंटर ऑफ एक्सलन्ससाठी पुरशी आहे, असे हेबळे यांनी आपल्या निवेदनात म्हटलं आहे.

दुसरीकडे कांपाल इनडोअर हा नेहमीच गजबजलेला असतो जिथे मेंबर्स, नवीन प्रशिक्षणार्थी आणि बॅडमिंटनपटू फिटनेससाठी तसेच राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्पर्धेच्या तयारीसाठी सरावासाठी वापर करत आहेत. या खेळात प्रोफेशन करण्यासाठी इच्छुक बॅडमिंटनपटूंना यामुळे धक्का बसेल, असे हेबळे म्हणाले. कांपालवरील सेंटर ऑफ एक्सलन्समुळे सागची आरसीसी योजना, बॅडमिंटन संघटनेचे खेळाडूंच्या विकासासाठी राबविण्यात येणारे विविध उपक्रम, प्रशिक्षण तसेच विविध बॅडमिंटन स्पर्धेचे वेळापत्रकही कोलमडेल, अशी चिंता हेबळे यांनी आपल्या निवेदनात व्यक्त केली आहे.

या विषयावर गोवा बॅडमिंटन संघटनेने शासन आणि गोवा ऑलिम्पिक संघटनेलाही निवेदन दिले असून गोवा क्रीडा प्राधिकरणाच्या आमसभेतही हा मुद्दा आम्ही उपस्थित केल्याचे हेबळे म्हणाले. खेलो इंडियाचा हा एक चांगला उपक्रम आहे, परंतू स्थानिक गरजा आणि गरजांनुसार काही सुधारणा करण्याचीही गरज आहे असे हेबळे यांनी आपल्या निवेदनात म्हटलं आहे. गोवा बॅडमिंटन संघटनेचे अध्यक्ष नरहर ठाकूर यांनी काही अधिकाऱयांची भेट घेतली असून अशा निर्णयामुळे येणाऱया अडचणींबद्दल माहितीही दिली आहे. क्रीडामंत्री गोविंद गावडे खेळाच्या विकासामध्ये वाढीव स्वारस्य दाखवत आहेत आणि आमच्याकडून आलेल्या सूचनांचा विचार केला जाईल असे हेबळे यांनी म्हटलं आहे.

Related Stories

कोलवेकर यांचा विजय हा भाजपासाठी योग्य धडा

Amit Kulkarni

‘त्या’ विद्यार्थ्यांच्या हकालपट्टीचा आदेश मागे घ्यावा

Amit Kulkarni

विजेच्या धक्क्याने केरी सत्तरीतील पंचायत शिपाईचा मृत्यू

Amit Kulkarni

भाजप महिला मोर्चाच्या कार्यकर्त्या रीना साप्ते, तृप्ती बाणावलीकर यांचा शिवसेना पक्षात प्रवेश

Amit Kulkarni

लेक्चर बेसिस शिक्षकांची पगारवाढ करावी

Amit Kulkarni

कुडचडेवासियांचा स्वाभिमान जागा झाल्याचे निकालातून स्पष्ट

Amit Kulkarni
error: Content is protected !!