दिवसात केवळ 2 तास काम, महिन्याला 7 लाखांची कमाई
एकीकडे अनेकांना दिवसभर मेहनत करूनही स्वतःच्या कुटंबाचे पालन-पोषण करणे शक्य होत नाही, तर दुसरीकडे दिवसात केवळ 2 तास काम करूनही काही लोक मोठी कमाई करत आहेत. याहून आश्चर्याची बाब म्हणजे त्यांचे काम अवघड नाही, परंतु पैसे एखाद्या कॉर्पोरेट जॉबसारखे मिळत आहेत.
25 वर्षीय वेबकॅम मॉडेल जेनिफर लव्ह दिवसभरात केवळ 2 तास काम करते आणि याच्या माध्यमातून सहजपणे महिन्याकाठी 7.47 लाख रुपये कमावत आहे. तिचे काम अत्यंत विचित्र आहे. 2020 पर्यंत एक वेट्रेस म्हणून काम करणाऱया जेनिफरने 2 वर्षांपूर्वी एक अजब सेवा देण्यास सुरुवात केली होती.
अपमान करण्यासाठी घेते रक्कम
लॉकडाउनदरम्यान तिच्या मित्राने तिला स्वतःच्या पायांची छायाचित्रे विकण्याचा सल्ला दिला. या सल्ला गांभीर्याने घेतल्यावर तिने 10-20 सेकंदांचे पर्सनलाइज व्हिडिओ तयार करून 4 हजार रुपयांपर्यंतची कमाई सुरू केली. हळूहळू ती स्वतःच्या क्लाएंट्ससाठी 3-4 मिनिटांपर्यंत व्हिडिओ तयार करायची यात ती केवळ समोरच्या व्यक्तीचा अपमान करत होती. लोकांना तिच्याकडून अपमान करवून घेण्यात आनंद वाटतो. अशाप्रकारचे ‘पेपिग’ सेशन तिच्यासाठी उत्पन्नाचे स्रोत ठरले आहे. लोक पैसे देऊन स्वतःची थट्टा करवून घेत असतात आणि यालाच पेपिग सेशन म्हटले जाते.
2 तासांचे काम
लोकांना माझे काम चुकीचे वाटते, परंतु मी केवळ 2 तास काम करत असल्याने ते चकित होतात. वेबकॅमवर येत लोक स्वतःचा अपमान करण्याची मागणी करतात. अशाप्रकारचे काम वीकेंडलाच अधिक मिळते आणि माझ्या क्लाएंट्समध्ये महिला देखील सामील आहेत. पूर्वी माझ्या कुटुंबाला हे काम आवडत नव्हते, परंतु त्यांनी माझ्यासोबतचे नाते तोडले नाही. तर माझ्या पार्टनरला याबद्दल कुठलाच आक्षेप नसल्याचे जेनिफरने सांगितले आहे.