Tarun Bharat

Paytm चे CEO विजय शेखर शर्मा यांची जामिनावर सुटका

ऑनलाईन टीम/तरुण भारत

पेटीएमचे संस्थापक विजय शेखर शर्मा यांना गेल्या महिन्यात दिल्ली पोलिसांनी अटक केली होती. त्यानंतर त्यांची जामिनावर सुटका करण्यात आली. अशी माहिती समोर आली आहे. शेखर शर्मा यांना बेदरकारपणे गाडी चालवल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती. ही घटना 22 फेब्रुवारी रोजी घडली. डीसीपी ड्रायव्हर दीपक कुमार यांनी या प्रकरणी एफआयआर दाखल केला होता. पेटीएमचे संस्थापक विजय शेखर शर्मा यांच्या कारला दिल्लीतील मालवीय नगर भागात मदर इंटरनॅशनल स्कूलजवळ अपघात झाला. विजय शेखर शर्मा यांनी दिल्ली पोलिस अधिकाऱ्याच्या कारला जग्वार लँड रोव्हर गाडीने धडक दिली. यांनतर त्यांना अटक झाली होती.

दरम्यान, दक्षिण दिल्लीच्या पोलिस उपायुक्त बेनिता मॅरी जॅकर यांच्या कारला फेब्रुवारी महिन्यामध्ये एका लक्झरी कारने टक्कर दिली होती. ही कर पेटीएमचे संस्थापक विजय शेखर शर्मा चालवत असल्याचा आरोप आाहे. या घटनेसंदर्भात डीसीपींच्या ड्रायव्हर कॉन्स्टेबलने केस दाखल केली होती. त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली होती.

Related Stories

गुजरातमधील तरुणाईचा अपेक्षाभंग : राहुल गांधी

Patil_p

तंजावरमध्ये मंदिर उत्सवादरम्यान विजेचा शॉक लागून 11 भाविकांचा मृत्यू

datta jadhav

मथुरा : जिल्हा रुग्णालयातील मुख्य चिकित्सा अधीक्षकास कोरोनाची बाधा

Tousif Mujawar

पूर्वी मिळालेली लसच ‘बुस्टर’साठी वापरणार

Amit Kulkarni

नागपूरचे मनपा आयुक्त तुकाराम मुंडे यांना कोरोनाची बाधा

Tousif Mujawar

“काम झालेले नसतानाही पंतप्रधानांकडून मेट्रोचे उद्घाटन”

Abhijeet Khandekar