मुंबई
पेटीएमचे समभाग सोमवारी आठवड्याच्या पहिल्या दिवशी शेअर बाजारात तेजी राखताना दिसून आले. चौथ्या तिमाहितील कामगिरीच्या निकालानंतर समभागाच्या भावाने सकारात्मक प्रतिसाद नोंदविला आहे. कंपनीचा समभाग 5 टक्के वाढत सोमवारी बीएसईवर इंट्राडे दरम्यान 726 रुपयांवर पोहोचला होता. पेटीएमने चौथ्या तिमाहित 168 कोटींचा तोटा प्राप्त केला आहे. जो मागच्या वर्षी याच अवधीत 763 कोटी इतका होता.