फोन नंबर व्यतिरिक्त ऍपवर पेमेंट करता येणार
वृत्तसंस्था./ नवी दिल्ली
पेटीएमच्या ग्राहकांना आता त्यांचा मोबाईल नंबर वापरुन इतर कोणत्याही पेमेंट ऍपवर थेट पैसे पाठवता येणार आहेत. ही सुविधा देणारे पहिलेच ऍप पेटीएम ठरणार आहे. सदरच्या ऍपद्वारे पेमेंटसाठी आतापर्यंत चार पर्याय होते. पहिला क्यूआर कोड, दुसरा युपीआय आयडी, तिसरा फोन नंबर आणि चौथा पर्याय बँक खाते तपशीलाच्या मदतीने व्यवहार करता येत होते. फोन पे व गुगल पे यांच्यानंतर पेटीएम हे तिसरे सर्वात मोठे पेमेंट ऍप राहिले आहे.
युपीआय चलनात वाढ
युपीआयद्वारे व्यवहाराची व्याप्ती सतत वाढत आहे. ऑक्टोबरमध्ये युपीआयच्या माध्यमातून एकूण 730 कोटी रुपयांचे व्यवहार झाले, ऑक्टोबरला युपीआय एकूण 12.11 लाख कोटींचे व्यवहार झाले अहेत.
युपीआयशी संबंधित मुद्दे
w युपीआय प्रणाली निधी हस्तांतरित करते. एका ऍप्लिकेशनमध्ये अनेक बँक खाती लिंक होतात.
w एखाद्याला पैसे पाठवण्यासाठी, तुम्हाला फक्त त्यांचा मोबाइल नंबर, खाते क्रमांक किंवा युपीआय आयडी आवश्यक आहे.
w आयएमपीएसच्या मॉडेलवर युपीआय विकसित करण्यात आल्यामुळे ग्राहकांना युपीआय ऍपद्वारे 24×7 बँकिंग करण्याची सुविधा उपलब्ध
w युपीआयसह ऑनलाइन शॉपिंगसाठी ओटीपी, सीव्हीव्ही कोड, कार्ड नंबर, एक्सपायरी डेट आवश्यक नाही.