Tarun Bharat

पेडणे पोलिसांनी धाड टाकून 85 हजारांचा चरस केला जप्त

Advertisements

प्रतिनिधी /पेडणे

पेडणे पोलिसांनी 1 रोजी मधलामाज मांदे येथे छापा टाकून येना व्हॅटकोव्स्काया या  रशियन महिलेकडून एकूण 85 ग्रॅम चरस जप्त करत त्याला ताब्यात घेत अटक केली. या चरसची बाजारापेठेत 85 हजार रुपये किंमत होते.

   पेडणे पोलीस उपनिरीक्षक हरीश वायगणकर, पोलीस उपनिरीक्षक विवेक हळर्णकर, महिला पोलीस उपनिरीक्षक सुमेधा नाईक, पोलीस कॉन्स्टेबल कृष्णा वेळीप, कॉन्स्टेबल सागर खोरजुवेकर, कॉन्स्टेबल सचिन हळर्णकर व कॉन्स्टेबल रजत गावडे यांच्या टीमने ही कारवाई केली. पेडणे पोलिसांना सूत्रांकडून माहिती मिळाली त्या आधारे मधलामाज मांदे येथे धाड टाकून अमलीपदार्थ बाळगलेल्या विदेशी महिला पर्यटकाला ताब्यात घेतले.

  येना व्हॅटकोव्स्काया (38 वर्षे) या रशियन महिलेकडून सुमारे 85 ग्रॅम चरस जप्त केले. पुढील तपास पोलीस निरीक्षक दत्ताराम राऊत आणि उपअधिक्षक सिद्धांत शिरोडकर यांच्या देखरेखीखाली सुरू आहे.

Related Stories

पर्यायी रस्त्याशिवाय रस्ता बंद करु देणार नाही

Patil_p

गौण खनिज आयातीसाठी यापुढे परवाना सक्तीचा

Patil_p

गोव्यातून कर्नाटक, मध्य प्रदेशला कामगार रवाना

Patil_p

पुनम पांडेचा जामीन रद्द होणार? आज सुनावणी

Omkar B

आणखी किती काळ आतले बाहेरचे करीत बसणार

Amit Kulkarni

गोवा-बेळगाव महामार्ग चकचकीत

Amit Kulkarni
error: Content is protected !!