क्रीडा मंत्री गोविंद गावडे यांचे आश्वासन
प्रतिनिधी /पेडणे
पेडणे सावळवाडा इंनडोअर स्टेडियम परिसरात निवासी प्रशिक्षण केंद्र शिवाय जलतरण तलाव आणि विविध सोयीसुविधा उपलब्ध करून देण्याची योजना असल्याची माहिती क्रीडामंत्री गोविंद गावडे यांनी सोमवारी 23 रोजी इंनडोअर स्टेडियमला भेट देऊन पाहणी केल्यानंतर दिली.
यावेळी पेडणे मतदारसंघाचे आमदार प्रवीण आर्लेकर, नगराध्यक्ष माधव सिनाई देसाई, उपनगराध्यक्ष तृप्ती आनंद सावळ देसाई, नगरसेविका अश्विनी पालयेकर, नगरसेवक शिवराम तुकोजी, नगरसेविका विशाखा गडेकर, कोरगाव माजी सरपंच स्वाती गवंडी, माजी उपनगराध्यक्ष रामा सावळ देसाई, क्रीडा अधिकारी महेश नाईक, सदानंद सावळ देसाई, कृष्णा पालयेकर, आनंद सावळ देसाई, पंच पद्मनाभ आसोलकर आदी उपस्थित होते.
सावळवाडा पेडणे येथील इंनडोअर स्टेडियमवर मागच्या सरकारने तब्बल 37 कोटी रुपये खर्च करून उभारला मात्र गेल्या दोन वर्षांपासून तो तसाच पडून आहे. या संदर्भात हल्लीच वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर आमदार प्रविण आर्लेकर आणि क्रीडामंत्री गोविंद गावडे यांनी दखल घेऊन या प्रकल्पाची पाहणी केली. क्रीडांगणासाठी आवश्यक सोयी सुविधा या मैदानात नाहीत शिवाय इंनडोअर स्टेडियम उभारताना ज्या काही महत्त्वाच्या सोयी उपलब्ध करायच्या होत्या त्याही उपलब्ध केलेले नाहीत. या सर्व सोयी सुविधा उपलब्ध करून देण्याची ग्वाही क्रीडामंत्री गोविंद गावडे यांनी यावेळी दिली.
शिवाय तालुक्मयासाठी जे क्रीडा मैदान पूर्वी होते त्या ठिकाणी दरवषी विविध क्रीडा महोत्सव, मेळावे आयोजित केले जायचे. त्यानुसार इनडोअर स्टेडियमच्या बाजूला असलेल्या मैदानाची अतिरिक्त जागा उपलब्ध करून देण्याचे आश्वासन मंत्री गावडे यांनी दिली. शिवाय योग्य ते कर्मचारी क्रीडा मैदानासाठी उपलब्ध देण्यात येतील, असे मंत्री गावडे यांनी सांगितले
सावळवाडा येथे जलतलाव उभारण्यासाठी प्रयत्न करणारः मंत्री गावडे
इंडोर स्टेडियम उभारताना पेडणे तालुक्मयासाठी जलतरण तलावाची सोय आराखडय़ात केली होती. परंतु तो जलतरण तलाव आजपर्यंत उभारला गेला नाही. त्यावरही आपण लक्ष घालून शिवाय क्रीडा प्रकल्पाच्या बाजूला काही अतिरिक्त जागा जमीनदारांकडे मिळत असेल तर त्या ठिकाणीही तो उभारला जाईल असे मंत्री गावडे म्हणाले.
मंत्री गोविंद गावडे यांनी पुढे बोलताना सांगितले की आमदार प्रवीण आर्लेकर यांच्या सूचनेनुसार आपण या मैदानाची पाहणी केली. शिवाय कोरगाव येथे जो इनडोअर स्टेडियम प्रकल्प उभारण्यात येत आहे आणि त्या ठिकाणी व्यायाम शाळेची व्यवस्था केलेली आहे. तो जीम वातानुकुलित पद्धतीने करावा अशी सूचना आपण अधिकाऱयाने केल्याचे मंत्री गावडे यांनी सांगितले.
सावळवाडा इनडोअर स्टेडियम विमानतळासाठी खासगी पद्धतीने दिला जाईल का असा सवाल स्थानिक पत्रकारांनी उपस्थित केला असता यावर भाष्य करण्यास नकार दिला. परंतु अशा पद्धतीचा प्रस्ताव सरकारकडे आला की नाही याची माहिती घेऊन आपण पुढील निर्णय घेणार असल्याचे मंत्री गावडे यांनी सांगितले. माञ हे क्रीडा संकुल हा पेडणेतील खेळडूंसाठीच असायला हवा या मताचा आपण आहे.तसेच आमदारही या बाबत ठाम असल्याचे ते म्हणाले .
पेडणेतील खेळाडूसाठी अद्यावत क्रीडा संकुलाची गरजः प्रवीण आर्लेकर
आमदार प्रवीण आर्लेकर यांनी सांगितले की, पेडणेतील सर्व खेळाडूना आणि क्रीडापटूंना योग्य ती व्यायाम आणि तंदुरुस्ती जीवन जगण्यासाठी क्रीडांगणाची गरज आहे. ही गरज लक्षात ठेवून गावागावातील क्रीडा मैदाने सुधारली जातील, अशी ग्वाही आमदार प्रवीण आर्लेकर यांनी दिली.