Tarun Bharat

Pegasus spyware: कर्नाटक काँग्रेसचे उद्या आंदोलन

बेंगळूर/प्रतिनिधी

कर्नाटकातील निजद-काँग्रेस युतीचे सरकार पाडण्यासाठी ‘पेगासस’ सॉफ्टवेअरचा वापर झाल्याची शक्यता अधिक आहे, असा दावा ‘द वायर’ या वृत्तसंस्थेने केला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. कर्नाटकचे कॉंग्रेस नेते गुरुवारी सकाळी विधान सौध ते राजभवनापर्यंत निषेध मोर्चा काढतील. विधान सौध येथून सकाळी १० वाजता निषेध मोर्चाला प्रारंभ होईल, अशी माहिती कर्नाटक प्रदेश काँग्रेस कमिटीने (केपीसीसी) दिली.

दरम्यान, कर्नाटकातील निजद-काँग्रेस युतीचे सरकार पाडण्यासाठी ‘पेगासस’ सॉफ्टवेअरचा वापर झाल्याची शक्यता अधिक आहे, असा दावा ‘द वायर’ या वृत्तसंस्थेने केला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. 2019 मध्ये तत्कालिन मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी, उपमुख्यमंत्री डॉ. जी. परमेश्वर, माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचे फोन टॅपिंग करण्यासाठी पेगाससचा वापर झाल्याचा गौप्यस्फोट करण्यात आला आहे. निजद-काँग्रेस युतीच्या काळात प्रमुख नेत्यांच्या फोनवरील संभाषणांवर नजर ठेवण्यात आली होती, असा दावाही या वृत्तसंस्थेने केला आहे.

शिवाय केंद्रातील अनेक प्रभावी नेत्यांचे फोनही हॅक करण्यात आल्याचा आरोप होत आहे. या मुद्दय़ावरून सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील नेत्यांनी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप सुरू केले आहेत.याविषयी प्रतिक्रिया देताना काँग्रेस नेते डॉ. जी. परमेश्वर यांनी, पेगासस सॉफ्टवेअरचा वापर करून माहिती चोरण्याचे मोठे षड्यंत्र रचण्यात आल्याने भीती निर्माण झाली आहे. या प्रकरणाविषयी चौकशी व्हावी, अशी मागणी केली आहे. तर उपमुख्यमंत्री डॉ. अश्वथ नारायण यांनी याविषयी चौकशीची सरकारची तयारी असल्याचे सांगितले आहे. तर निजद नेते कुमारस्वामी यांनी या प्रकरणाविषयी गंभीरपणे विचार करण्याची गरज नसल्याचे सांगितले आहे.

Related Stories

बेंगळुरू: एचएएलकडून दोन रुग्णवाहिका दान

Archana Banage

‘मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना मेकेदातू प्रकल्प कृती आराखडा तयार करण्याचे दिले निर्देश’

Archana Banage

धारवाड हद्दीत झालेल्या अपघातात ४ जण जागीच ठार

Archana Banage

राज्यातील 6 ठिकाणी हेलिपोर्ट : मंत्री योगेश्वर

Amit Kulkarni

कर्नाटकात १ सप्टेंबरपासून दररोज पाच लाख जणांचे होणार लसीकरण: मुख्यमंत्री

Archana Banage

गुलबर्गा विद्यापीठ दीक्षांत समारंभ : शुक्रवारी १५,०२९ विद्यार्थी पदवीधर होणार

Archana Banage
error: Content is protected !!