वृत्तसंस्था/ टेक्सास
येथे सुरू असलेल्या डब्ल्यूटीए टूरच्या फायनल्स स्पर्धेत शुक्रवारी बेलारुसच्या सातव्या मानांकित आर्यना साबालेन्काने अमेरिकेच्या जेसिका पेगुलाचा प्राथमिक गटातील लढतीत पराभव केला.
शुक्रवारी झालेल्या या गटातील सामन्यात साबालेन्काने पेगुलावर 6-3, 7-5 अशा सेट्समध्ये मात केली. आता टय़ुनिशियाची जेबॉर आणि इटलीची मारिया सॅकेरी यांच्यातील सामन्यानंतर साबालेन्कानेचा उपांत्य फेरीतील प्रवेश निश्चित होईल. साबालेन्काने आपल्या गटातून आघाडीचे स्थान मिळविले आहे. तिने आपल्या गटातील सामन्यात आतापर्यंत दोन विजय आणि एक पराभव नोंदविला आहे.