आयआयटी कानपूरकडून निर्मिती
आतापर्यंत तुम्ही हिरव्या, निळय़ा, काळय़ा, लाल, पिवळय़ा, चमकणाऱया रंगाची शाई असलेले पेन पाहिले असेल. परंतु आयआयटी कानपूरने एक चांदीची शाई असणारे पेन तयार केले आहे. याच्या मदतीने आता 12 वीपर्यंतचे विद्यार्थी इलेक्ट्रॉनिक्स शिकू शकतील आणि अत्यंत सहजपणे साधारण कागदावर स्वतःचे सर्किटही तयार करू शकणार आहेत.
आयआयटी कानपूरच्या स्टार्टअप लिखोट्रानिक्स अंतर्गत फ्लेक्सिबल इलेक्ट्रॉनिक्स विभागात डॉ. आशीष आणि प्राध्यापक महापात्रा यांच्या टीमने एक उत्पादन तयार केले आहे. याचे नाव ‘सीखो सर्किट’ ठेवण्यात आले आहे. या अनोख्या प्रकारच्या किटमध्ये विद्यार्थ्यांसाठी मॅग्नेटिक शीट, दोन पेन, कंपोनेंट कनेक्टर्स, मॉडय़ूल बुक, कॅपॅसिटर, बॅटरीसवमेत अनेक उपकरणे ठेवण्यात आली आहेत. डॉ. आशीष यांनी या विशेष उत्पादनाची माहिती दिली आहे. मागील 5 वर्षांपर्यंत सातत्याने संशोधन पूर्ण केल्यावर त्यांना हे यश मिळाले आहे.
मेड इन इंडिया स्पेशल पेन
अशाप्रकारचे पेन तयार करण्यामागे विविध कारणांमुळे प्रयोगशाळांपासून दूर राहणाऱया विद्यार्थ्यांना मदत व्हावी असा हेतू होता. एका उपकरणाने हँड्स ऑन ट्रेनिंग म्हणून बसल्या-बसल्यास स्वतःच्या प्रयोगांना शिकण्यासह त्यांना एक नव्या पातळीवर नेण्यास मदत होणार आहे. यापूर्वी केवळ अमेरिकेत अशाप्रकारचे किट तयार होत होते. परंतु आता आयआयटी कानपूरमध्ये याची निर्मिती सुरू झाली आहे. हे उत्पादन भारतीय विद्यार्थ्यांसाठी अत्यंत उपयुक्त लाभ होणार आहे. याच्या मदतीने प्रयोग करणाऱया विद्यार्थ्यांना स्वतःच्या प्रतिभेला अधिक उत्तम पद्धतीने वाव देता येणार असल्याचे डॉ. आशीष यांनी सांगितले आहे.
किंमत अन् कार्यस्वरुप
या पेनची वैशिष्टय़े आणि छायाचित्रे दोन्हीही आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या विशेष ‘सीखो सर्किट’ उत्पादनाचा वापर करणे अत्यंत सोपे आहे. मॉडय़ुल बुकच्या एका पेजवर चांदीची शाई असणाऱया पेनने त्यावर सर्किट तयार करता येते. या सीखो सर्किट किटची किंमत 2200 रुपये ठेवण्यात आली आहे. परंतु याची किंमत कमी करण्यावर आयआयटी-केची टीम विचार करत आहे.