Tarun Bharat

अग्निशामक दलाच्या वाहनांना अडथळा ठरणाऱया वाहनांना दंड द्या!

अग्निशामक दलासमोर सर्रास बेकायदेशीर वाहन पार्किगचे प्रकार : तक्रार निवारणांनतर कार्यालय गाठताना मार्गावर अडथळे

प्रतिनिधी /फोंडा

संततधार पावसाने थैमान घातल्याने आपत्तकालीन व्यवस्था सांभाळणाऱया अग्निशामक दल व रूग्णवाहिकांना महत्चाची भूमिका बजावावी लागत आहे. वारखंडे-फोंडा येथील अग्निशामक दलासमोर दुतर्फा चारचाकी पार्क करून ठेवत असल्यामुळे अग्निशामक दलाचे वाहने तक्रार निवारण करून परत कार्यालयात येणाऱया मार्गावर वाहने पार्क केल्याने दुसऱया तक्रारीला जाण्यासाठी वेळ वाया जात आहे.

अग्निशामक दलाची वाहने, रूग्णवाहिका अशा आपत्कालीन वाहनांना मार्ग देणे बंधकारकर आहे. अग्निशामक दलाने वारंवार या मार्गावर पार्क करण्यात आलेल्या वाहनावर कारवाई करण्यासंबंधी वाहतूक खात्याशी संपर्क साधल्याची माहिती प्राप्त झाली आहे. मात्र वाहतूक खात्यातर्फे कोणतीच कारवाई करण्यात येत नसल्याचे दिसून येते. शहर परिसरात सर्वत्र सार्वजनिक ठिकाणी अडथळा निर्माण करणाऱया वाहनाला ‘लॉकअप’ करून चलन फाडण्यात येत आहे. फोंडा-पणजी महामार्गावर वारखंडे येथे  मिळेल त्या जागेवर वाहने पार्क करण्यात येत आहेत. येथून ये-जा करणारे वाहतूक पोलीसही डोळोझाक करीत आहे. रस्त्यावरून वाहन घेऊन प्रवास करताना किंवा ते पार्क करताना अन्य वाहनांना अडथळा निर्माण होणार नाही याची काळजी बाळगणे वाहनचालकांना चलन फाडल्यानंतरच लक्षात येईल अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

वाहने पार्क केल्याने अग्निशामक दलाच्या वाहनांना अडथळा

वारखंडे येथील अग्निशामक दलाची वाहने ज्या मार्गाने तक्रारी निवारण करून आतमध्ये येतात तोच मार्ग मुक्तीधाम स्मशानभूमीत जातो. त्यामुळे अंत्यविधीसाठी येणाऱया वाहनांची रांग काहीवेळी लागलेली असते. या मार्गावर सुचनाफलक उभारण्यात यावा, किंवा वाहतून पोलिसांनी नजर ठेवावी. अग्निशामक दलाच्या वाहनांना अडथळा आणणाऱया वाहनांवर कारवाई करावी. काही वाहने या स्थानावर कायमस्वरूपी पार्क करून ठेवण्यात आल्याचे निदर्शनास येते. तसेच आपत्कालीन स्थितीची जाणीव ठेवून  सुचनाफलक लावण्यात आलेल्या ठिकाणी नियमांची अंमलबजावणी होईल याबाबत वाहतूक खात्याने दक्ष रहावे अशी मागणी काही सुज्ञ नागरिकांनी केली आहे.

Related Stories

सांगेतील सातही पंचायतींवर भाजप समर्थकांची निवड

Amit Kulkarni

माशेलातील प्रसिद्ध चिखलकाला आज

Amit Kulkarni

सांकवाळ येथे गांजा लागवड प्रकरणी वृध्दास अटक

Omkar B

वैफल्यग्रस्ततेतून खंवटेंची मुख्यमंत्र्यांवर टीका

Omkar B

आज गडगडाटासह पावसाची शक्यता

Patil_p

अ. भा. विद्यापीठ स्पर्धेसाठी गोव्याचा महिला ज्युडो संघ जाहीर

Patil_p