Tarun Bharat

विंडीज संघाला दंड

वृत्तसंस्था/ ब्रिजटाऊन

न्यूझीलंडचा संघ सध्या विंडीजच्या दौऱयावर तीन सामन्यांची वनडे मालिका खेळत आहे. या मालिकेतील रविवारी झालेल्या तिसऱया आणि शेवटच्या सामन्यात विंडीजला षटकांची गती राखता न आल्याने सामनाधिकाऱयांनी या संघाला दंड ठोठावला आहे.

आयसीसीच्या ईलाईट पॅनेलचे सामनाधिकारी रिची रिचर्डसन यांनी विंडीज संघाला मिळणाऱया मानधनातील 40 टक्के रक्कम दंड म्हणून ठोठावली आहे. पुरनच्या नेतृत्वाखाली विंडीज संघाला या सामन्यात निर्धारित वेळेत षटके पूर्ण करता आली नाहीत. या संघातील प्रत्येक खेळाडूला मिळणाऱया मानधनातील 20 टक्के रक्कम दंड म्हणून द्यावी लागणार आहे. तर संपूर्ण संघाला 40 टक्के दंड या पॅनेलने ठोठावला आहे. विंडीजचा कर्णधार पुरनने आपला हा गुन्हा मान्य केला आहे.

Related Stories

गर्ग, जयस्वाल, जुरेल यांची शानदार अर्धशतके

Patil_p

क्रिकेटपटू बिस्नोई, निर्मोही कोरोना बाधित

Patil_p

कॅनडाची बुचार्ड तिसऱया फेरीत

Patil_p

किचेनॉक-ओस्टापेंको दुहेरीत अजिंक्य

Patil_p

अँडी मरे दुसऱया फेरीत

Patil_p

शकीब हसनचे पुनरागमन

Patil_p