मावळते सरन्यायाधीश रमणा यांचे भाष्य ः कार्यकाळ समाप्त
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
भारताचे सरन्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती एन. व्ही. रमणा यांचा कार्यकाळ शुक्रवारी समाप्त झाला. याप्रसंगी आयोजित करण्यात आलेल्या निरोपपर कार्यक्रमात बोलताना त्यांनी न्यायव्यवस्थेतील आपल्या निष्कर्षाबाबत परखडपणे भाष्य केले. प्रलंबित खटले हे देशाच्या न्यायव्यवस्थेतील ‘मोठे आव्हान’ असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच सर्वोच्च न्यायालयात सुनावणीसाठी खटल्यांची यादी देण्याच्या मुद्यावर फारसे लक्ष दिले जात नसल्याची खंतही व्यक्त केली. प्रलंबित खटल्यांच्या वाढत्या ओझ्यावर उपाय शोधण्यासाठी आधुनिक तांत्रिक साधने आणि कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले.
सरन्यायाधीश एन. व्ही. रमणा शुक्रवारी निवृत्त झाले. आपल्या कार्यकाळातील शेवटच्या दोन दिवसांत त्यांनी अनेक महत्त्वाच्या खटल्यांची सुनावणी घेतली. सेरेमोनियल बेंचला निरोप देताना ऍटर्नी जनरल के. के. वेणुगोपाल यांनी तुमच्या माध्यमातून आम्ही एक बुद्धिजीवी आणि उत्कृष्ट न्यायाधीश पाहिल्याचे व प्रत्यक्ष अनुभवल्याचे गौरवोद्गार काढले. त्याचवेळी ज्ये÷ वकील दुष्यंत दवे यांना कार्यक्रमस्थळी अश्रू आवरता आले नाहीत. दवे अश्रू ढाळत असल्याचे पाहून रमणा यांनी ‘तुम्ही लोकांचे न्यायाधीश आहात’ असे सांगत त्यांना सावरण्याचा सल्ला दिला. हा कार्यक्रम सर्वोच्च न्यायालयाच्या वेबसाईटवर वेबकास्ट करण्यात आला होता. सर्वोच्च न्यायालयाच्या इतिहासात थेट प्रक्षेपण होण्याची ही पहिलीच वेळ होती.
निरोपपर कार्यक्रमात रमणा यांनी विविध मुद्दय़ांना स्पर्श करत उपस्थितांना मार्गदर्शन केले. आम्ही काही मॉडय़ूल विकसित करण्याचा प्रयत्न केला असला तरी, सुसंगतता आणि सुरक्षा समस्यांमुळे आम्ही फारशी प्रगती करू शकलो नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. न्यायव्यवस्थेच्या गरजा इतरांपेक्षा वेगळय़ा असून जोपर्यंत बार संघटना मनापासून सहकार्य करण्यास तयार होत नाही तोपर्यंत आवश्यक बदल घडवून आणणे कठीण होईल, असेही त्यांनी पुढे सांगितले. याचवेळी या व्यवसायात येणारे कनि÷ उमेदवार आपल्या वरि÷ांकडे आदर्श म्हणून पाहतात. त्यामुळे मी सर्व वरि÷ांना त्यांना योग्य मार्गदर्शन करण्याची विनंती करतो, असेही त्यांनी स्पष्ट केले.
लाईव्ह स्ट्रिमिंगची गरज
2018 पासून लाईव्ह स्ट्रिमिंग केले जाणार होते, परंतु न्यायालयाने त्याचा वापर केला नाही. यापूर्वी 26 सप्टेंबर 2018 रोजी, सर्वोच्च न्यायालयाच्या 3 न्यायाधीशांच्या खंडपीठाने लैंगिक गुन्हे आणि वैवाहिक विवादांचा समावेश असलेल्या प्रकरणांशिवाय सुनावणीच्या थेट प्रसारणास परवानगी दिली होती. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने त्याचा व्यवहारात अवलंब केला नाही. कोविड-19 साथीच्या काळात न्यायालयीन कामकाज चालू ठेवण्याचा प्रयत्न केला असला तरी तांत्रिक समस्यांमुळे त्याला फारसे बळ मिळाले नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. कर्नाटक, गुजरात, ओडिशा सारखी देशातील अनेक उच्च न्यायालये त्यांच्या संबंधित अधिकृत यूटय़ूबवर सुनावणीचे थेट प्रक्षेपण करत आहेत, याचा दाखलाही त्यांनी याप्रसंगी दिला.
यु. यु. लळीत नवे सरन्यायाधीश
एन. व्ही. रमणा यांच्या निवृत्तीनंतर न्यायमूर्ती यु. यु. लळीत हे देशाचे 49 वे सरन्यायाधीश असतील. न्यायमूर्ती लळीत आज शनिवार, 27 ऑगस्ट रोजी सरन्यायाधीश म्हणून शपथ घेणार आहेत. सर्वोच्च न्यायालयाचे दुसरे सर्वात ज्ये÷ न्यायाधीश न्यायमूर्ती लळीत हे फक्त 74 दिवसांसाठी सरन्यायाधीश बनतील. ते 8 नोव्हेंबरला निवृत्त होणार आहेत. न्यायमूर्ती लळीत हे ‘तिहेरी तलाक’च्या प्रथेला बेकायदेशीर ठरवण्यासह अनेक ऐतिहासिक निकालांचा भाग आहेत.