बेळगाव – केंद्रीय जलशक्ती मंत्री गजेंद्रसिंग शेखावत यांनी ग्वाही दिल्यामुळे खानापूर तालुक्यातील म्हादाई योजना लवकरच मंजुरी मिळणार असल्याची माहिती राज्याचे पाटबंधारे मंत्री गोविंद कारजोळ यांनी दिली आहे. कारजोळ यांची नुकतीच नवी दिल्ली येथे केंद्रीय जलशक्ती मंत्री गजेंद्रसिंग शेखावत यांची भेट घेऊन कर्नाटकातील विविध पाटबंधारे योजनांबाबत त्यांच्याशी चर्चा केली त्यावेळी म्हादाई योजनेला तातडीने मंजुरी देण्याची ग्वाही शेखावत यांनी दिली आहे.
म्हादाई योजनेतील कळसा – भांडुरा नाल्याचे काम न्यायालयाच्या स्थगितीमुळे सध्या बंद आहे. तथापि या योजनेचा सुधारित आराखडा पाटबंधारे खात्याने तयार केला आहे. तो आराखडा अंतिम मंजुरीसाठी केंद्रीय जल आयोगाकडे पाठवला आहे. तो मंजूर झाल्यानंतर कळसा- भांडुरा दोन नाल्यांचे काम सुरू करता येणार आहे. म्हादाई योजनेतून कळसा व भांडुरा दोन नाल्यांचे पाणी वळवून मलप्रभा नदीत सोडले जाणार आहे. त्यासाठी कृत्रिम कालवे तयार केले जात आहेत. गोवा सरकारने त्याला आक्षेप घेऊन जल लवादाकडे तक्रार केल्यामुळे कामाला स्थगिती मिळाली त्यानंतर कर्नाटक सरकारने या योजनेचा सुधारित आराखडा तयार केला आहे आता केंद्रीय जलशक्ती मंत्र्यांच्या ग्वाहीमुळे म्हादाई योजनेला लवकरच मंजुरी मिळणार असल्याची कर्नाटक पाटबंधारे मंत्री कारजोळ यांनी सांगितले आहे.
Previous Articleनियमित ‘या’ 5 टिप्स फॉलो करा, डॉक्टर आणि औषधांना ठेवा दूर
Next Article रयत शिक्षण संस्थेत मोठे राजकारण : खा. उदयनराजे भोसले