Tarun Bharat

पूरात बुडाले गाव तरीही लोक आनंदी

युक्रेनचे डेमीडिव गाव पुरात बुडाले आहेत. या संकटामुळे दुःखी होण्याऐवजी ग्रामस्थ आनंद व्यक्त करत आहेत. युक्रेनच्या सैन्याने गावातील बंधारा खोलून सीमा क्षेत्राला दलदलयुक्त केले आहे. यामुळे रशियाचे रणगाडे कीव्हवर हल्ला करण्यासाठी घुसू शकणार नाहीत आणि युकेनच्या सैन्याला तयारीसाठी पुरेसा वेळ मिळणार आहे. 750 घरे असणाऱया या गावातील अनेक घरे सध्या बुडालेली आहेत.

रशियाचा गोळीबार 4 ठार

युक्रेनच्या डोनेट्स्क शहरावर रशियाच्या सैन्याने पेलेल्या गोळीबारात 4 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 11 जण जखमी झाले आहेत. तर खारकीव्हवर रशियाच्या हल्ल्यात 3 नागरिक मारले गेले आणि 8 जण जखमी झाले. रशियाच्या सैन्याने पुन्हा शहरावरील बॉम्बवर्षाव तीव्र केल्याचे खारकीव्ह प्रशासनाने म्हटले आहे.

स्टील प्रकल्पात लोक अडकलेलेच

मारियुपोलच्या अजोस्टाल स्टील प्रकल्पात सुमारे 1 हजार नागरिक अडकून पडले आहेत. यातील बहुतांश महिला आणि मुले आहेत. एक दिवस अगोदर येथून सुमारे 100 नागरिकांना बाहेर काढण्यात आले होते. सोमवारी पुन्हा नागरिकांना बाहेर काढण्याचे काम होणे अपेक्षित होते.

Related Stories

सर्वात स्वतः इलेक्ट्रिक हवाईयान लवकरच

Patil_p

रशिया- युक्रेन युद्ध थांबण्याची चिन्हे

Patil_p

दक्षिण चीन समुद्र वादादरम्यान भारताचे मोठे पाऊल

Patil_p

येमेनमधील ‘ड्रगन ब्लड ट्री’ संकटात

Patil_p

अमेरिकेत टीव्हीचे सुवर्णयुग समाप्त

Patil_p

जेथे माणूस चुंबकासारखा चिकटतो

Patil_p